शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोटच्या तीन मुलींवर नराधम बापाकडून अत्याचार; दोन मुली अल्पवयीन; नालासोपाऱ्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 08:44 IST

पीडित मुली मूळच्या कोकणातील कणकवली येथे राहणाऱ्या आहेत. मुलींचा बाप असलेला आरोपी हा खंडणी, गोळीबार, तसेच हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : आपल्या पोटच्या ३ मुलींवर त्यांच्या वडिलांनीच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या मुलींनी नालासोपारा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणातील दोन मुली अल्पवयीन आहेत, तर एक मुलगी २१ वर्षांची आहे. मुलींचा बाप असलेला आरोपी हा खंडणी, गोळीबार, तसेच हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे. बुधवारी पोलिसांनी मुलींचे जबाब नोंदवून गुन्हा दाखल करत आरोपी नराधम बापाला अटक केली आहे. 

पीडित मुली मूळच्या कोकणातील कणकवली येथे राहणाऱ्या आहेत. आरोपी असलेला बाप हा ५६ वर्षीय असून त्याला ५ मुली आहेत. कोकणातील गावी असताना तो या मुलींवर बलात्कार करत होता. यापैकी एका मुलीचा ४ वेळा गर्भपातही करण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. अखेर पित्याच्या अत्याचाराला कंटाळून आई पाचही मुलींना घेऊन नालासोपारा येथे एका नातेवाइकाच्या आश्रयाला आली. या ३ मुलींपैकी मोठी मुलगी २१ वर्षांची असून अन्य दोन मुली या अल्पवयीन आहेत. मोठ्या मुलीने याबाबतची फिर्याद दिली आहे. आतापर्यंत वडिलांच्या दहशतीमुळे गप्प बसल्याचे मुलींनी पोलिसांना सांगितले.  

आरोपी बापावर गंभीर गुन्हेआरोपी बापावर हत्या, खंडणी, गोळीबार यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. २००४ मध्ये त्याने एक हत्याही केली होती. फरार आरोपीला अटक केल्याची माहिती नालासोपारा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल वळवी यांनी दिली. ही घटना गंभीर असून आम्ही मुलींची तक्रार आल्यावर गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंतच्या तपासात ३ मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती परिमडंळ तीनचे पोलिस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली.

पत्नीसह मुलीची हत्या करत आत्महत्यानालासोपारा : विरारच्या बोळींज पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाने आपल्या पत्नीसह ५ वर्षांच्या चिमुकल्या मुलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर स्वतःसुद्धा गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ते बुधवारी दुपारी या दरम्यान घडली आहे. बोळींज पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विरारच्या ग्लोबल सिटीतील मैत्री हाईट्स येथे उदयकुमार काजवा (५२) हे पत्नी विना (४२) आणि मुलगी शिवालिका (५) यांच्यासह राहात होते. अज्ञात कारणावरून उदयकुमार यांनी विना व शिवालिका या दोघींची गळा दाबून हत्या केली आहे. त्यानंतर त्यांनी बेडरूममध्ये गळफास घेतला. 

टॅग्स :Molestationविनयभंग