शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांवरील कर्ज भरण्याचे आमिष दाखवून फसवणूक, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 01:18 IST

कर्जाने घेतलेल्या वाहनांचे बँकेचे हप्ते भरतो, असे सांगून ती वाहने ताब्यात घेऊन त्यांची परस्पर विक्री करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांना मिळाली होती.

ठाणे : वाहनांवरील कर्ज फेडण्याचे आमिष दाखवून वाहन ताब्यात घेऊन नंतर त्याची परस्पर विक्री करणाऱ्या तिघांच्या टोळीतील वसीम सलीम शेख (३४, रा. मालेगाव) याला शनिवारी मालेगाव येथून कासारवडवली पोलिसांनी अटक केली. यापूर्वीही इसाक शेख (२९, रा. औरंगाबाद) याच्यासह दोघांना औरंगाबाद येथून अटक केली असून, त्यांच्या आणखी एका साथीदाराचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.कर्जाने घेतलेल्या वाहनांचे बँकेचे हप्ते भरतो, असे सांगून ती वाहने ताब्यात घेऊन त्यांची परस्पर विक्री करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे इसाक शेख आणि खयूम शेख (रा. औरंगाबाद) या दोघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार आणि पोलीस निरीक्षक प्रदीप उगले यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार चंद्रशेखर सकपाळे, पोलीस हवालदार प्रशांत सांगळे आणि विश्वनाथ दुर्वे यांच्या पथकाने औरंगाबाद येथून ११ मार्च रोजी अटक केली. त्यांना ठाणे न्यायालयाने १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चौकशीतून मालेगाव येथून वसीम याला १४ मार्च रोजी पोलिसांनी अटक केली. त्याला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.इसाक आणि खयूम हे दोघेही वाहन विकत घेणारे आहेत. वसीम हा वाहनमालकांची फसवणूक करून त्यांच्याकडील वाहने परस्पर विक्री करणारा आहे. या टोळीने आणखी किती जणांची अशाप्रकारे फसवणूक केली आहे, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.वसीमविरुद्ध मध्य प्रदेशातही गुन्हेवसीम याने मध्यप्रदेशातही अशाच प्रकारे वाहनमालकांची फसवणूक केली आहे. त्याच्याविरुद्ध मध्यप्रदेशातील मुगट रोड आणि पनदाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.ठाण्यात अशी झाली फसवणूकठाण्याच्या कासारवडवली येथील रहिवासी नितीन सांगळे यांनी एक ट्रक १६ लाखांमध्ये कर्जाने विकत घेतला होता. या ट्रकचे महिना ३६ हजारांचे बँकेचे हप्ते परवडत नसल्याचे त्यांनी भिवंडीत कामासाठी आलेल्या वसीमला सांगितले होते, तेव्हा तुझे बँकेचे हप्ते भरतो, कर्जही फेडतो; पण कर्जाचे हप्ते पूर्ण होईपर्यंत ट्रक आमच्याकडे दे, अशी गळ घातल्याने सांगळे यांनी त्यांचा ट्रक वसीमला दिला होता. सुरुवातीला त्यांच्याशी फोनवर बोलणारा वसीम नंतर फोनही घेईना. कालांतराने तो पसार झाला. या प्रकरणाची तक्रार सांगळे यांनी २१ जानेवारी २०२० रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याच फसवणुकीचा तपास करताना पोलिसांनी या तिघांना अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे