शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

मुंबई: प्रसिद्ध कंपन्यांची बनावट उत्पादने बनवणाऱ्या भिवंडीच्या कारखान्यावर धाड; तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2022 21:53 IST

हँडवॉश, फिनाईल, एअरफ्रेशनर सारखी उत्पादनांचा समावेश, ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मच्छर पळवण्यासाठीचे लिक्विड, एअरफ्रेशनर, फिनाईल, हँडवॉश, शौचालय सफाई लिक्विड, कपडे धुण्याची पावडर आदी प्रसिद्ध कंपन्यांच्या बनावट उत्पादन व विक्री करणारे रॅकेट खाजगी गुप्तचर व मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणले. वरसावे नाका व भिवंडी येथील कारवाईत ६० लाखांची बनावट उत्पादने व कच्चा माल जप्त करून तिघांना अटक केली.

हार्पिक, डेटॉल, लायझॉल, कॉलिन आदींची बनावट उत्पादने तयार करून विक्री केली जात असल्याची माहिती कंपनीने नेमलेल्या खाजगी गुप्तचर कंपनीला मिळाल्या नंतर त्यांनी मीरा भाईंदर-वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार केली होती. खाजगी गुप्तचर कंपनीला मिळालेल्या माहिती नंतर त्यांच्या अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखा १ चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे सह सहायक निरीक्षक सुर्वे, उपनिरीक्षक हितेंद्र विचारे, तांबे पाटील, पठाण यांच्या पथकाने २६ जुलै रोजी वरसावे नाका येथील फाउंटन हॉटेल जवळ सापळा रचला होता. गुप्त माहिती नुसार एक इनोव्हा व सोबत एक लहान टेम्पो आला असता पोलिसांनी त्या दोन्ही वाहनांना ताब्यात घेतले व चौकशी सुरु केली. इनोव्हामध्ये मेहुल भूपेंद्र लिंबाचिया (३०) तर टेम्पो मध्ये चालक जाकीर मुसा शेख (२८) हे दोघे होते. दोन्ही वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये हार्पिक , लायझल , डेटॉल , कोलिन, सर्फ एक्सेल, गोदरेज आदीची गुडनाईट लिक्विड, एअरफ्रेशनर, फिनाईल, हँडवॉश, शौचालय सफाई लिक्विड, कपडे धुण्याची पावडर आदीचा साठा सापडला. बनावट लेबल लावलेली ती बनावट उत्पादने असल्याने पोलिसांनी १० लाखांची इनोव्हा आणि ५ लाखांचा टेम्पो सह २ लाख ६६ हजारांची बनावट उत्पादने असा एकूण १७ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल त्यात जप्त केला. 

पोलिसांनी दोघाही आरोपींची कसून चौकशी केल्या नंतर सदर बनावट उत्पादने हि भिवंडीच्या कोपर भागातील अरिहंत कॉम्प्लेक्स मधील गाळ्यात बनवली जात असल्याचे सांगितले . पोलिसांनी लागलीच जाकीर ला घेऊन भिवंडी गाठले . पोलिसांनी त्या गाळ्यां मध्ये धड टाकली असता तेथे रजनीश पाठक नावाचा व्यवस्थापक आणि ४ कामगार आढळून आले. त्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात विविध रसायने , रिकाम्या बाटल्या व खोके , प्रसिद्ध कंपन्यांची बनावट लेबल व पॅकिंग आवरणे व बनावट तयार केलेला माल सापडला . सदर कारखाना बिपीन पटेल नावाच्या इसमाचा असून त्या ठिकाणी  डोमेक्स , गोदरेज,   टेपोल , लायझॉल , हार्पिक , गुड नाईट , ऑल आउट आदीचा बनावट व कच्चा माल आसा मिळून एकूण ५७ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 

या प्रकरणी २८ जुलै रोजी काशीमीरा पोलीस ठाण्यात मेहुल लिंबाचिया , जाकीर शेख , रजनीश पाठक ह्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण एकूण ७५ लाख २३ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे . ह्या प्रकरणात आरोपी बिपीन पटेल सह अन्य लोकांचा पोलीस शोध घेत आहेत

टॅग्स :raidधाडMumbaiमुंबईBhiwandiभिवंडी