शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देशातील अखेरच्या ‘टाडा’ खटल्यात भाई ठाकूरसह तिघे निर्दोष; बिल्डर सुरेश दुबे खून खटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 05:21 IST

बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे यांचा ९ ऑक्टोबर १९८९ रोजी नालासोपारा रेल्वे स्थानकावर पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : विरार येथील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे खून प्रकरणात जयेंद्र ऊर्फ भाई ठाकूर याच्यासह तिघांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी दिले. ‘टाडा’ कायद्यांतर्गत दाखल असलेल्या देशातील शेवटच्या खटल्याचा निकाल न्यायालयाने दिला. दुबे खून प्रकरणात १७ आरोपींना अटक करण्यात आली होती. या खटल्यात न्यायालयाने ६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

जयंत ऊर्फ भाई विष्णू ठाकूर, दीपक ठाकूर, गजानन पाटील अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या खटल्यात नरेंद्र भालचंद्र भोईर, ज्ञानेश्वर पाटील, उल्हास राणे, पॅट्रिक तुस्कानो, राजा जाधव, माणिक पाटील यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.   

बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे यांचा ९ ऑक्टोबर १९८९ रोजी नालासोपारा रेल्वे स्थानकावर पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. त्यावेळी या सर्व परिसरात भाई ठाकूर याची दहशत होती. या प्रकरणात पोलिसांनी टाडा (टेररिस्ट अँड डिस्ट्रप्टिव्ह ॲक्टव्हिज (प्रिव्हेन्शन) ॲक्ट) नुसार कारवाई केली होती.

शेवटचा टाडा खटला  देशातील या शेवटच्या टाडा खटल्याची सुनावणी २००५ मध्ये सुरू झाली होती.   सरकार पक्षाने ८० हून अधिक साक्षीदार तपासले. या प्रकरणात एकूण १७ आरोपी होते.   सध्या ५ आरोपींविरुद्ध सुनावणी सुरू होती. सुनावणीदरम्यान दोघांचे निधन झाले.   त्यात भाई ठाकूर, त्याचा भाऊ दीपक ठाकूर आणि गजानन पाटील हे तीन आरोपी होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी