शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोणी काळभोर येथे जमीन प्लॉटिंग वादात डोक्याला पिस्तुल लावत जीवे मारण्याची धमकी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 13:35 IST

जमीन प्लॉटिंगसाठी घेण्यावरून झालेल्या वादामुळे शिवीगाळ व मारहाण करत डोक्याला पिस्तूल लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

लोणी काळभोर : राहु (ता. दौंड ) येथील ३८ गुंठे जमीन प्लॉटिंगसाठी घेण्यावरून झालेल्या वादामुळे शिवीगाळ व मारहाण करत डोक्याला पिस्तूल लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी बाळासाहेब शिंदे ( रा. बोरी भडक, ता. दौंड ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या संदर्भात तेजस रंगनाथ म्हेत्रे ( वय. २३, रा. सहजपूर, ता. दौंड ) याने लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेतीसह प्लॉटिंगचा व्यवसाय करतात. २९ जानेवारी रोजी या दोघांनी मकसूद शेख यांची राहू ( ता. दौंड ) येथील ३८ गुंठे जमिनीचे ताबा साठेखत केडगाव ( ता. दौंड ) येथील दुय्यम निबंधक कार्यालयात करून घेतले होते. त्याचा भाऊ महेश, मित्र राजू सुर्यवंशी व बाळासाहेब शिंदे उरुळी कांचनमधील एका हॉटेलमध्ये भेटले. चर्चेत तेजस व महेशने आपण मित्र आहोत. आपल्यात भांडण नको. तो प्लॉट आम्ही घेतला आहे असे बाळासाहेब शिंदेला सांगितले. यावेळी शिंदेने चिडून शिवीगाळ करून तेजसला हाताने मारहाण केली. कमरेचा पिस्तूल काढून तेजसच्या डोक्याला लावला व माझ्या प्लॉटिंगमध्ये पडतोस काय, तुला आता जिवंत ठेवणार नाही अशी धमकी आरोपीने फिर्यादींना दिली. तेवढ्यात राजू सुर्यवंशीने त्याच्या हातावर फटका मारला. त्यामुळे पिस्तूल खाली पडले.       पुढील तपास पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले करीत आहेत. 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस