पिंपरी : तुझे अश्लील फोटो माझ्याकडे आहेत, ते फोटो मी मुंबईच्या व्हॉटाअॅप ग्रुपवर व्हायरल करणार आहे. असे धमकावणाºया अज्ञाताविरूद्ध हिंजवडीतील आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरूणीने निगडी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूणीला एका अज्ञाताने मोबाईलवर संपर्क साधला. त्याने तरूणीचा चेहरा वापरून अश्लील फोटो तयार केले. ते फोटो मित्र मंडळीच्या ग्रुपवर व्हायरल करण्याची धमकी दिली. यातून सुटका पाहिजे असेल तर एक मिनिटाचा नग्नावस्थेतील व्हिडीओ मला पाठव, मी कोणालाही दाखवणार नाही. असे म्हणत व्हॉटसअॅप कॉल करून त्रास दिला. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मोबाइल क्रमांकाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
आयटी पार्क मध्ये काम करणाऱ्या तरुणीला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 14:27 IST
तरूणीला एका अज्ञाताने मोबाईलवर संपर्क साधला. त्याने तरूणीचा चेहरा वापरून अश्लील फोटो तयार केले...
आयटी पार्क मध्ये काम करणाऱ्या तरुणीला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी
ठळक मुद्देमाहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल