शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बातमी छापून बदनामी करण्याची धमकी, दोन खंडणीखोर पत्रकारांना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 15:33 IST

माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागवून त्यासंदर्भात बातमी छापून बदनामी करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या दोन खंडणीखोर पत्रकारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गोरेगाव पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले.

माणगाव : माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागवून त्यासंदर्भात बातमी छापून बदनामी करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या दोन खंडणीखोर पत्रकारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गोरेगाव पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले.तक्रादार रमेश भोजा शेट्टी (रा. पुणे) यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग येथे येऊन त्यांच्या मौजे शिलीम (ता. माणगाव) येथील २८ एकर शेतीमध्ये शासकीय योजना राबविल्या आहेत. त्यामध्ये पंतप्रधान मत्स्यसंवर्धन योजनेचा लाभ घेतला; परंतु प्रत्यक्षात काम केले नाही. म्हणून पत्रकार भिवा पवार आणि राजन पाटील यांनी त्यांना माहिती अधिकाराखाली अर्ज करून माहिती घेऊन ती प्रसिद्ध करून बदनामी करू, अशी धमकी देत होते. हे प्रकरण मिटवण्यासाठी म्हणून ५ लाखांची मागणी केली होती. तक्रारदार यांनी तडजोडीअंती २ लाख देण्याचे मान्य केले आहे, असे सांगून त्या दोघांविरुद्ध खंडणीची तक्रार दिली.  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नावले व पथकाने गोरेगाव पोलीस ठाण्याचे हद्दीतील मुंबई- गोवा महामार्गाच्या  बाजूला, लोणेरे (ता. माणगाव) येथे पंचांसह सापळा लावून दोन्ही आरोपींना तक्रारदार यांच्याकडून ठरल्याप्रमाणे २ लाख रुपये खंडणीच्या स्वरूपात स्वीकारत असताना ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्ही आरोपी हे सरस्वती विद्यामंदिर वडघर मुद्रे, (ता. माणगाव) येथे २००७ पासून शिक्षक म्हणून काम करत असून, शिक्षकाची नोकरी करत करत एका वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. आरोपींकडून रोख रक्कम दोन लाख, दोन मोबाइल, असा एकूण २ लाख ३३ हजार ८००  रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.वरील दोन आरोपींविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

टॅग्स :ArrestअटकJournalistपत्रकार