शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस सत्तेत आली तर मोदींना जिवे मारण्याची धमकी; कर्नाटकातील व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 11:21 IST

मोहम्मद रसूल कद्दारे असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर हैदराबादसह विविध ठिकाणी त्याचा शोध घेतला जात आहे.

देशात काँग्रेस सत्तेत आली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिवे ठार मारण्य़ाची धमकी देणाऱ्या कर्नाटकच्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हिड़ीओ पोस्ट करून त्याने ही धमकी दिली होती. या व्हिडीओमध्ये हा व्यक्ती हातात तलवार घेऊन ही धमकी देत होता. त्याचा आता शोध घेतला जात आहे.

मोहम्मद रसूल कद्दारे असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर हैदराबादसह विविध ठिकाणी त्याचा शोध घेतला जात आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, मोहम्मद रसूल कद्दारे यांने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यात तो तलवार हातात घेऊन पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी देताना दिसत होता.

आयपीसीच्या कलम ५०५(१)(बी), २५(१)(बी) आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये त्याच्याविरुद्ध यादगिरीच्या सुरपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींची हत्या आणि अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणार ईमेल केंद्रीय सुरक्षा एजन्सीला आला होता. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या सुटकेच्या मागणीसह ५०० कोटी रुपये मागण्यात आले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसKarnatakकर्नाटक