शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

एकाच व्यक्तीचे हजारावर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 05:56 IST

ॲण्डरसनच्या मृत्यूनंतर तब्बल १२ वर्षांनी म्हणजे २०२० मध्ये एका माजी विद्यार्थ्यांनं ॲण्डरसनविरुद्ध विद्यापीठाकडे लैंगिक शोषणाची तक्रार केली. त्यानंतर अनेक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी पुढे आल्या आणि त्यांनीही विद्यापीठाकडे तक्रार केली.

एखाद्या व्यक्तीनं किती जणांचं लैंगिक शोषण करावं किंवा किती जणांची त्याविषयी तक्रार असावी? लैंगिक शोषणाच्या घटना जगभरात सगळीकडेच घडत असतात. कोणताच देश त्याला अपवाद नाही. पुराव्याअभावी किंवा तक्रारीअभावी हे शोषक सहीसलामत सुटतात ही आणखी एक वेगळी गोष्ट.मिशिगन युनिव्हर्सिटीमधील एक घटना मात्र काही बाबतीत अतिशय वेगळी आहे. या विद्यापीठात शिकवत असणारे प्रो. डॉ. रॉबर्ट ॲण्डरसन यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप होते.  केवळ तरुणींनीच नाही तर तरुणांनीही याबाबत तक्रार केली होती. यातली आश्चर्याची गोष्ट म्हणजे जवळपास तीस वर्षांपेक्षाही अधिक काळ हे प्राध्यापक महाशय विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण करीत होते.  आपली कारकिर्द संपून ते निवृत्तही झाले, एवढंच काय, २००८ मध्ये त्यांचा मृत्यूही झाला, पण जिवंत असेपर्यंत त्यांनी केलेल्या लैंगिक शोषणाबद्दल एकानंही तक्रार केली नाही.ॲण्डरसनच्या मृत्यूनंतर तब्बल १२ वर्षांनी म्हणजे २०२० मध्ये एका माजी विद्यार्थ्यांनं ॲण्डरसनविरुद्ध विद्यापीठाकडे लैंगिक शोषणाची तक्रार केली. त्यानंतर अनेक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी पुढे आल्या आणि त्यांनीही विद्यापीठाकडे तक्रार केली.

किती जणांनी ॲण्डरसनविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार करावी? तब्बल १०५० मुलं-मुली त्यासाठी पुढे आले. लोकांनीही त्यांना साथ दिली. विद्यार्थी, समाजाचा हा रेटा वाढतच गेला, विद्यापीठासमोर आंदोलनं सुरू झाली, त्यानंतर विद्यापीठानं या प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्यासाठी एक समितीही नेमली. ॲण्डरसननी तब्बल चार दशकं विद्यापीठात काम केलं, त्या काळात त्यांनी केलेले लैंगिक अत्याचार उघडकीस येऊ शकले नाहीत. कारण तक्रार करायलाच कोणी पुढे आलं नाही. ॲण्डरसनविरुद्धच्या तक्रारी समोर आल्यानंतर समितीनं कसून चौकशी केली आणि त्यांना विद्यार्थ्यांच्या आरोपात तथ्य आढळून आलं. या प्रकरणात ॲण्डरसन दोषी आहेत, हे त्यांनी आपल्या अहवालात नमूद केलं.

ॲण्डरसन आता मृत झाले असले, तरी विद्यापीठानं विद्यार्थ्यांच्या अन्यायावरची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे अत्याचार झालेल्या विद्यार्थ्यांना तब्बल ४९० मिलिअन डॉलर्सची (सुमारे ३६०० कोटी रुपये) नुकसानभरपाई दिली जाणार आहे. अत्याचारग्रस्तांची मागणी अधिक रकमेची होती, पण या रकमेवर शेवटी ‘तडजोड’ करण्यात आली. यातील ४६० मिलियन डॉलर्सची रक्कम त्या अत्याचारग्रस्तांना दिली जाणार आहे, तर भविष्यात पुन्हा अशी काही घटना घडलीच, तर त्यासाठीची तरतूद म्हणून ३० मिलियन डॉलर्सची रक्कम विद्यापीठाच्या राखीव निधीमध्ये वर्ग केली जाणार आहे.अर्थातच ४६० मिलियन डॉलर्स भरपाईतील किती रक्कम कोणाला मिळेल हे अजून निश्चत नाही. सगळ्यांना सारखीच रक्कम मिळेल असंही नाही. कोणावर किती, कसा अत्याचार झाला, त्यानुसार ही रक्कम ठरवली जाणार आहे. त्याची वर्गवारी कशी करायची हेदेखील एक मोठं आव्हान आहे. त्यासाठी एका त्रयस्थ संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे.

यासंदर्भातल्या अभ्यास गटाचं म्हणणं आहे, ॲण्डरसन यांनी १९६६ ते २००३ इतका दीर्घकाळ विद्यापीठात काम केलं. या ३७ वर्षांच्या काळात असे अनेक प्रसंग आले, संधी मिळाल्या, ज्यावेळी ॲण्डरसनच्या कारवायांवर चाप बसवता येऊ शकला असता, पण विद्यापीठ प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळेच ॲण्डरसन यांची हिंमत वाढत गेली आणि विद्यापीठावर आज नामुष्कीची वेळ आली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेली अनेक वर्षे मिशिगन विद्यापीठ अमेरिकेतल्या सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एक म्हणून गणले जात आहे. याप्रकरणी अनेक विद्यार्थ्यांनी वैयक्तिक तर काहींनी एकत्रितपणे तक्रार केली होती. १०५० तक्रारदारांपैकी तब्बल २५० जणांचं वकीलपत्र घेतलेल्या ॲटर्नी मिक ग्रेवाल यांनी यासंदर्भात म्हटलं आहे, उशिरा का होईना, अत्याचारग्रस्तांना न्याय मिळतो आहे. अर्थातच या अत्याचारांची भरपाई कशानंही होऊ शकत नाही. टॅड डेलुका यानं मिशिगन ॲथलेटिक संचालक वार्डे म्यॅन्युअल यांना सर्वप्रथम पत्र पाठवलं होतं. ॲण्डरसन यांच्या अत्याचाराचा पाढा त्यानं त्याच्या पत्रात वाचला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ॲण्डरसनविरुद्ध वादळ उठलं.

साधं खरचटलं, तरीही तपासण्या!ॲण्डरसनविरुद्ध अनेक माजी विद्यार्थिनींनी आरोप केले की, साधा थंडी-ताप आला तरीही ज्याची काहीही गरज नाही, अशा चाचण्या ॲण्डरसन करायला लावत  असत. अगदी साधं खरचटलं, तरीही ते पेल्विक एक्झामिनेशन करत. यात महिलांच्या पुनरुत्पादक अवयवांची चाचणी घेतली जाते. ॲण्डरसन प्रकरणात मिशिगन विद्यापीठाला आता मोठी आर्थिक भरपाई द्यावी लागेल, त्यांची जी काही बदनामी व्हायची, ती झाली, पण अशी प्रकरणं नवी नाहीत. यापूर्वीही लैंगिक छळाच्या प्रकरणात अनेक विद्यापीठांना मोठी रक्कम मोजावी लागली आहे. त्यात पेन स्टेट युनिव्हर्सिटी, ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी.. इत्यादी विद्यापीठांचाही समावेश आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषण