शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

११ लाखांची रोकड अन‌् तीन तोळे दागिने असलेली तिजोरी चोरट्यांनी पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 21:57 IST

नाशिक शहर व परिसरात पुन्हा गुन्हेगारीने नववर्षात डोके वर काढले आहे. शहर पोलिसांपुढे वाढत्या गुन्हेगारीचे आव्हान उभे राहिले आहे. शहरात खून, घरफोड्या, जबरी लूट, हाणामाऱ्या, वाहनचोरीसारख्या घटना सातत्याने घडू लागल्याने नाशिककरांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देकामगारनगरमधील घटनेने पोलिसांना दिले आव्हानशहरात गुन्हेगारीने काढले डोके वर

नाशिक : शहर व परिसरात सातत्याने घरफोड्या, वाहनचोरी, जबरी चोरीसह खनाच्या घटना घडत असताना चोरट्यांनी कामगारनगरमध्ये भरदुपारी 'मधुमैत्री' नावाच्या बंगल्याचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत घराच्या कपाटात ठेवलेली ११ लाख रुपयांची रोकड आणि तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने ज्या तिजोरीत ठेवलेले होते, ती तिजोरीच हातोहात लांबविल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.१३) दुपारी घडली. एकीकडे सोनसाखळी चोरांनी पोलिसांच्या नाकीनव आणले असताना दुसरीकडे दिवसाढवळ्या मोठी घरफोडी करत गुन्हेगारांनी पोलिसांना पुन्हा खुले आव्हान दिल्याची चर्चा होऊ लागली आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मधुमैत्री बंगल्यात राहणारे डॉ. नरेंद्र पाटील व त्यांची पत्नी कामानिमित्त बुधवारी दुपारच्या सुमारास बंगल्याचा दरवाजा बंद करुन घराबाहेर पडले. बंगल्याच्या मुख्य दरवाजाला आतील बाजुने लॉक करण्यात आले असतानाही चोरट्यांनी हे लॉक तोडून मुख्य दरवाजातून घरामध्ये प्रवेश केला. घरातील लोखंडी गोदरेजची तिजोरीच चोरट्यांनी पळविली. या तिजोरीत सुमारे ११ लाख रुपयांची रोकड व तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असल्याचे पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.दवाखान्याची बाह्यरुग्न तपासणी आटोपून पाटील जेव्हा संध्याकाळी घरी परतले तेव्हा त्यांना बंगल्याचा दरवाजा उघडा असल्याचे लक्षात आले. यावेळी त्यांनी तत्काळ बेडरुममध्ये धाव घेतली असता तेथे रोकड, दागिने असलेली तिजोरीच गायब असल्याचे दिसले. पाटील यांनी त्वरित पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घटनास्थळी पोलीस दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती तत्काल बिनतारी संदेश यंत्रणेवरुन देत परिसरात नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले. सातपुर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtheftचोरीRobberyचोरी