यवतमाळ - येथून शंभर किलोमीटर अंतरावरील पुसद शहरात समतानगर येथे रात्री चार चोरटे एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरात शिरले. सदर कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. हे कुटुंबीय रात्री परत आले असता त्यांना बाहेरचा लाईट बंद आणि घरातील सुरू दिसला. त्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी शेजाऱ्यांनाही उठविले. यावेळी चोरटे घरात होते, कुणी तरी आल्याची कुणकुण लागताच चोरटे सावध झाले. आपल्याला घरात कोंडले जाईल या भीतीने या चोरट्यांनी घराकडे डोकावणाऱ्यांवर थेट गोळीबार केला व सर्वांच्या नजरेसमोर पळून गेले. या घरातून नेमके काय चोरी गेले हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान चोरट्यांनी गोळीबार केल्याच्या घटनेने पुसद शहरात खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी सकाळीच पुसद शहर गाठून घटनास्थळी भेट दिली. तपासाबाबत पुसद पोलिसांना मार्गदर्शन केले. हे चोरटे कोण याचा शोध पुसद पोलिसांकडून घेतला जात आहे. चोरटे जिल्ह्यातील की शेजारील जिल्ह्यातील या दृष्टीने तपास केला जात आहे.
खळबळजनक! पुसदमध्ये चोरट्यांचा गोळीबार, पोलीस अधीक्षक दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 14:48 IST
चोरटे जिल्ह्यातील की शेजारील जिल्ह्यातील या दृष्टीने तपास केला जात आहे.
खळबळजनक! पुसदमध्ये चोरट्यांचा गोळीबार, पोलीस अधीक्षक दाखल
ठळक मुद्देचोरटे घरात होते, कुणी तरी आल्याची कुणकुण लागताच चोरटे सावध झाले.चोरट्यांनी गोळीबार केल्याच्या घटनेने पुसद शहरात खळबळ उडाली आहे.