शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात चोरट्यांनी पोलिसाच्या भावाचेच घर फोडले; देवही चोरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 14:32 IST

अमृतधामला दहा लाखांची घरफोडी : सोन्याचे दागिने रोकड लंपास

- संदीप झीरवाळलोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : नाशिक पोलिस आयुक्तालयातील सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याच्या अमृतधाम परिसरात राहणाऱ्या भावाच्या बंगल्याचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे दहा लाख रुपयांची घरफोडी केल्याची घटना शुक्रवारी (दि.१७) उघडकीस आली आहे. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याच्याच भावाच्या बंगल्यात धाडसी घरफोडीची घटना घडल्याने सर्वसामान्य जनतेचे काय असा सवाल नागरिकांनी केला आहे. या धाडसी घरफोडी प्रकरणी अजित सुनिल पवार यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पवार यांचा एसएसडी नगर बाजुला मातोश्री नावाचा बंगला असून पवार कामानिमित्त ठाणे येथे गेले असता (दि. १३ ते १७) कालावधीत कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याचे तळ मजल्यावर असलेले शटरचे कुलूप तोडून बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे लॅच तोडून घरात प्रवेश करून हॉल व बेडरूममध्ये असलेल्या लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून त्यात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने, रोकड असा ९ लाख ९९ हजार ५० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. बंगल्यात घरफोडी झाल्याच्या घटनेची माहिती परिसरात राहणाऱ्या काही नागरिकांनी शिवसेनेचे पदाधिकारी दिगंबर मोगरे यांना कळविली त्यानंतर मोगरे यांनी पवार यांना फोन करून घरफोडी झाल्याची माहिती

दिल्यानंतर पवार यांनी नाशिक गाठून पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भरवस्तीत घडलेल्या या घरफोडीच्या घटनेमुळे पोलिस प्रशासन सुस्त झाल्याची चर्चा परिसात रंगली आहे.

देवघरतील देवही चोरलेचोरट्यांनी पवार यांच्या घरात प्रवेश केल्यावर लोखंडी कपाटाचे लॅच तोडून दागिने रोकड लंपास केली. तसेच देवघरतील देवही चोरले आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी