चोरी करण्यासाठी घरात घुसला; सुंदर महिला पाहताच चोराचा इरादा बदलला अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 01:05 PM2021-11-15T13:05:54+5:302021-11-15T13:07:50+5:30

चोरी करताना घरातील सुंदर महिलेला पाहून चोराचा इरादा बदलला

thief entered the house to steal saw a beautiful woman changed his intentions | चोरी करण्यासाठी घरात घुसला; सुंदर महिला पाहताच चोराचा इरादा बदलला अन् मग...

चोरी करण्यासाठी घरात घुसला; सुंदर महिला पाहताच चोराचा इरादा बदलला अन् मग...

googlenewsNext

पाटणा: बिहारची राजधानी पाटण्यात चोरीच्या घटना वाढत आहेत. घरात कुटुंबाचं वास्तव्य असतानाही चोरीच्या घटना घडत आहेत. विमानतळ असलेल्या चौधरी टोला परिसरात शनिवारी रात्री एक अजब घटना घडली. रात्री चोरी करण्यासाठी घरात घुसलेल्या एका चोरानं त्या घरात एका महिलेला पाहिलं. सुंदर महिला एकटी असल्याचं पाहून चोराची नियत फिरली. 

घरात सुंदर महिला एकटीच असल्याचं पाहून चोर जबरदस्ती करू लागला. त्यामुळे महिला घाबरली आणि बचावासाठी आरडाओरडा करू लागली. ते पाहून चोर तिथून पळाला. मात्र तो गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवून घेत चोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चोराची रवानगी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्याचं नाव सौरव आहे.

पोलीस ठाण्याचे प्रभारी अरुण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी टोलामध्ये वास्तव्यास असलेला सौरव त्याच्याच परिसरात असलेल्या एका घरात चोरीच्या उद्देशानं शिरला. त्या घरात एक महिला तिच्या लहान मुलासोबत झोपली होती. सौरवनं तिच्या उशीखालून कपाटाची चावी घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या हाती १० हजार रुपयांचं बंडल लागलं. 

चोर १० हजार रुपये लांबवत असताना महिलेला जाग आली. तिनं आरडाओरडा सुरू केला. महिलेला पाहताच चोराची नियत फिरली. त्यानं महिलेसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेला अधिक जोरात आरडाओरड सुरू केल्यानं चोरानं पळ काढला. पळणाऱ्या चोरावर गस्ती पथकाची नजर गेली. त्यांनी त्याला पकडलं. महिलेनं चोरानं ओळखलं. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: thief entered the house to steal saw a beautiful woman changed his intentions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.