शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

आधी घरफोडी, मग मंदिरात जाऊन देवाची माफी; अखेर 'तो' चोर पोलिसांच्या जाळ्यात

By कुणाल गवाणकर | Published: November 05, 2020 2:48 PM

व्यापाऱ्यांच्या घरात चोऱ्या करणाऱ्या चोराला अखेर बेड्या

अमरावती: पोलिसांनी अमरावतीमधून एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या चोरट्यानं अनेक व्यवसायिकांच्या घरात चोरी करून लाखो रुपये घेऊन लंपास केले होते. जयंतीलाल उर्फ कमलेश खेतमाल ओसवाल असं अटक करण्यात आलेल्या चोराचं नाव आहे. तो मूळचा सूरतचा रहिवासी आहे. सिटी लाईट परिसरात वास्तव्यास असलेल्या राधेशाम गर्ग यांच्याकडे घरफोडी करून फरार झालेल्या ओसवालचा अनेक दिवसांपासून शोध सुरू होता. अखेर अमरावतीत त्याला अटक झाली.२० ऑक्टोबरला गर्ग यांच्या घरातून ६ लाख रुपये घेऊन पसार झालेला ओसवाल राज्य परिवहनच्या बसनं वापीला पोहोचला. त्यानंतर त्यानं नंदूरबार आणि मग अमरावती गाठलं. विशेष म्हणजे त्यानं चोरी केलेली रक्कम वापीतल्या दोन बँक खात्यांमध्ये ठेवली. मूळव्याधावरील उपचारांसाठी त्यानं १.४४ लाख रुपये स्वत:कडे ठेवले. इलेक्ट्रॉनिक सर्विलान्सच्या मदतीनं ओसवालला अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेतल्या पोलिसांनी दिली. सहज पैसे मिळवण्याचा मार्ग म्हणून ओसवाल चोरी करत होता, असंदेखील त्यांनी सांगितलं. राधेशाम गर्ग यांच्या आधी ओसवालनं नऊ जणांच्या घरी चोरी केली होती. त्यामुळे पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. कपाटात लपवून ठेवलेल्या लॉकरच्या चावीच्या मदतीनं चोरी करून ओसवालनं रोकड लांबवली. मात्र त्यानं दागिन्यांना हात लावला नाही.याआधी ओसवालला चोरी प्रकरणी अनेकदा अटक झाली आहे. ओसवाल प्रत्येक चोरीनंतर मंदिरात जाऊन देवाकडे आपण केलेल्या पापाबद्दल माफी मागायचा. तो अहमदाबाद आणि अन्य ठिकाणी असलेल्या मंदिरांमध्ये अनेकदा जायचा. ओसवाल आधी कोट्यधीश व्यापारी, व्यवसायिकांच्या चालकांशी संपर्क साधून त्यांच्याशी मैत्री करायचा. त्यानंतर त्यांच्याकडे नोकसीसाठी विचारणा करायचा. मितभाषी स्वभावामुळे त्याला बऱ्याचदा नोकरी मिळायची. त्यानंतर योग्य संधी मिळताच तो घरफोडी करून पसार व्हायचा. लॉकडाऊन काळात नोकरी नसल्यानं ओसवाल एका उड्डाणपुलाखाली वास्तव्यास होता. त्यावेळी त्यानं भीक मागून उदरनिर्वाह केला.