शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल चोरटा गजाआड; महात्मा फुले पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 22:01 IST

कल्याण महात्मा फुले पोलीस स्थानकाच्या हद्दीत नव आंबिका नगर येथील एका घरात 30 डिसेंम्बर रोजी घरफोडी करत 1 लाख 60 हजरांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली होती.

कल्याण: महात्मा फुले पोलिसांनी एका अट्टल चोरट्याला गजाआड केले आहे. आरिफ शेख असे या चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसना यश आले असून पोलिसांनि त्याच्याकडून 3 लाख 42 हजरांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरिफ चे दोन साथीदार असलम शेख व मोहमद खान हे फरार असुन पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

कल्याण महात्मा फुले पोलीस स्थानकाच्या हद्दीत नव आंबिका नगर येथील एका घरात 30 डिसेंम्बर रोजी घरफोडी करत 1 लाख 60 हजरांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली होती.या प्रकरणी पोलीसानी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.तपास करत असताना या गुन्ह्यातील आरोपी आरिफ शेख चिकणघर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे काल दुपारच्या सुमारास  महात्मा फुले पोलीस स्थानकाच्या पथकाणे चिकणघर परिसरात सापळा रचत आरिफ शेख याला अटक केली तर त्याचे साथीदार असलम शेख व मोहमद खान हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत . आरिफ शेख विरोधात याआधी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून पोलिसांनी 6 गुन्ह्यांची उकल करत त्याच्याकडून 3 लाख 42 हजरांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती एसीपी अनिल पोवार यांनी पत्रकार परिषदेत दिली .विदेशी पिस्तूलासह तडीपार गुंड गजाआड

कल्याण : कल्याण पूर्व अशोक नगर वालधुनी येथे राहणारा दीपक उर्फ पिंटू घाडगे याला 22 फेब्रुवारी रोजी 2 महिण्याकरिता ठाणे महसुली हद्दीतून तडीपार केले होते .तडीपार केले असताना देखील घाडगे वालधुनी परिसरात फिरत असल्याची माहिती महात्मा फुले पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकरी दीपक सरोदे याना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे सरोदे यांनी आपल्या पथकासह थेट वालधुनी परिसर गाठत घोडगे याला वालधुनी परिसरातून अटक केली .त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे विदेशी बनावटीचे पिस्तुल आढळून आले. दीपक उर्फ़ पिंटू घाडगे विरोधात हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्या विरोधात याआधी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो पिस्तुल कुणाकडून व कोणत्या कारणासाठी घेऊन आला होता याचा तपास सुरू असल्याची माहिती एसीपी अनिल पोवार यांनी दिली .

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसRobberyचोरी