शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस असल्याचे सांगून वृद्धेच्या सोन्याच्या बांगड्या पळविल्या

By दत्ता यादव | Updated: May 18, 2023 16:36 IST

पिशवीमध्ये बांगड्या ठेवण्याचे नाटक करत चोरट्यांनी सोन्याच्या बांगड्या हातचलाखी करून लांबविल्या.

सातारा : येथील पोवई नाक्यावर भर वर्दळीच्या ठिकाणी पोलिस असल्याचे सांगून दोघा भामट्यांनी वृद्धेच्या सोन्याच्या बांगड्या हातोहात लांबविल्या. ही घटना मंगळवार, दि. १६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जयश्री विनायक देशपांडे (वय ७३, रा. चैत्यन्य हाउसिंग काॅलनी, शाहूनगर, सातारा) या मंगळवारी सायंकाळी पोवई नाक्यावरील एका दवाखान्यात आल्या होत्या. त्यावेळी तेथे दोन युवक आले. ‘आम्ही पोलिस आहोत, तुम्ही सोन्याच्या बांगड्या कशासाठी घातल्या आहेत. चोऱ्या होत आहेत. त्या काढून द्या, तुमच्या पिशवीत ठेवतो,’ असे म्हणून त्यांच्याकडून बांगड्या काढून घेतल्या.

पिशवीमध्ये बांगड्या ठेवण्याचे नाटक करत चोरट्यांनी सोन्याच्या बांगड्या हातचलाखी करून लांबविल्या. काही वेळानंतर देशपांडे यांना आपल्या पिशवीमध्ये बांगड्या नसल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी घरी गेल्यानंतर हा प्रकार घरातल्यांना सांगितला. त्यानंतर बुधवारी सायंकाळी देशपांडे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून सातारा शहरात अशाच पद्धतीने अनेकांना गंडा घालण्यात आला आहे. मात्र, तोतया पोलिस अद्यापही खऱ्या पोलिसांना सापडले नाहीत. याबाबत अधिक तपास हवालदार दळवी हे करीत आहेत. 

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर