शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ चार वादग्रस्त अधिकारी पुन्हा सेवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 10:33 IST

चार अधिकाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारकडून क्लीन चिट दिल्याचे समोर आले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या चार अधिकाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारकडून क्लीन चिट दिल्याचे समोर आले आहे. या चारही अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेत असल्याबाबतचे शासन आदेश गुरुवारी जारी करण्यात आले. यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक पराग मणेरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांचा समावेश आहे.  

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या कथित खंडणी प्रकरणात पराग मणेरे यांचे नाव समोर आले  होते. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तर राजेंद्र पाल यांच्यावर परभणी जिल्ह्यात असताना एका तरुणाला गुन्ह्यात न अडकविण्यासाठी दोन कोटींची मागणी करणे आणि त्यातील १० लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना एसीबीने अटक केली होती. त्या वेळी पाल हे सेलू उपविभागीय कार्यालयाचे उपअधीक्षक पदावर कार्यरत होते. तर अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करुन गैरवर्तन करणे, स्वतःच्या वाहनावर लाल दिवा लावून फिरणे महत्त्वाच्या बंदोबस्तावेळी मुख्यालयाची परवानगी न घेता बाहेर फिरणे याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. 

६५ अधिकारी गुन्हे शाखेत... पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई गुन्हे शाखेतील ५ वर्षांहून अधिक कार्यकाळ काम केलेल्या ६५ अधिकाऱ्यांची अन्य ठिकाणी बदली करण्यात आली. त्या अधिकाऱ्यांना पुन्हा गुन्हे शाखेत घेण्याची लगबगही मुंबई पोलीस दलात पाहावयास मिळत आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिले हाेते नाराजीचे पत्र   सुजाता पाटील यांच्याकडे मेघवाडी विभागाची जबाबदारी असताना एसीबीने ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. त्यानंतर, त्यांनाही सेवेतून निलंबित केले होते. निलंबनापूर्वी हिंगोली येथे बदली न मिळाल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना नाराजीचे पत्र लिहिल्यामुळे देखील चर्चेत आल्या होत्या.  एसीबीच्या कारवाईनंतरही कारवाई चुकीची असल्याचा दावा करत त्यांचा व्हायरल व्हिडीओही चर्चेत आला होता. 

टॅग्स :Policeपोलिस