शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 20:27 IST

आरोपीने महिलेच्या तोंडात स्फोटक पदार्थ घालून स्फोट घडवला, ज्यामुळे तिचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला आणि तिचा मृत्यू झाला.

कर्नाटकच्या मैसूर जिल्ह्यातील एका गावातून अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. इथे एका २० वर्षीय विवाहित महिलेची तिच्या प्रियकराने क्रूरपणे हत्या केली. आरोपीने महिलेच्या तोंडात स्फोटक पदार्थ घालून स्फोट घडवला, ज्यामुळे तिचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. महिलेचा मृतदेह एका लॉजच्या खोलीत पलंगावर पडलेला आढळला, तर खोलीच्या जमिनीवर सर्वत्र रक्त पसरले होते.

मृत महिलेची ओळख पटलीपोलिसांनी मृत महिलेची ओळख रक्षिता म्हणून पटवली आहे, जी गेरासनहल्लि गावाची रहिवासी होती. रक्षिताचा विवाह केरळमधील एका मजुरासोबत झाला होता, पण तिचे तिच्या नातेवाईक असलेल्या सिद्धराजु सोबत प्रेमसंबंध होते.

रविवारी हे दोघे भेर्या गावातील एका लॉजमध्ये थांबले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिथे दोघांमध्ये काही कारणावरून जोरदार भांडण झाले. याच वादातून आरोपीने महिलेच्या तोंडात बॉम्ब सदृश स्फोटक पदार्थ घातला आणि खाणींमध्ये जिलेटिनच्या कांड्या उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रिगरचा वापर करून स्फोट घडवला.

आरोपीचा बनाव उघडहल्ल्यानंतर आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याने सांगितले की महिलेचा मृत्यू मोबाइल फोनच्या स्फोटामुळे झाला आहे. पण, त्याच्या बोलण्यावर कोणाचाही विश्वास बसला नाही. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना स्थानिकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटक