शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

न्यायालयाकडून तत्काळ दिलासा नाही, वाझे यांच्या अटकपूर्व जामिनावर १९ मार्चला ठाण्यात सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 06:52 IST

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वाझे यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात जोरदार हल्ला चढवून त्यांच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या बदलीची घोषणा केली होती.

ठाणे  :  मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात वादग्रस्त ठरलेले व एटीएसकडून चौकशी करण्यात आलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी ठाणे  सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. शनिवारच्या सुनावणीत त्यांचा अर्ज फेटाळून न्यायालयाने पुढील सुनावणी १९ मार्च २०२१ रोजी ठेवली. (There is no immediate relief from the court, Waze's anticipatory bail hearing in Thane on March 19) मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वाझे यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात जोरदार हल्ला चढवून त्यांच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या बदलीची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांची गुप्तवार्ता विभागातून विशेष शाखा १ मध्ये बदली केली असून नागरी सुविधा केंद्र विभागाचा पदभार त्यांच्याकडे सोपविला. दरम्यान, मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एटीएसकडे देण्यात आला असून एटीएसने आतापर्यंत तीन वेळा वाझे यांची चौकशी केली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲंटिलिया निवासस्थानाबाहेर स्फाेटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. त्याचा तपास त्यांच्याकडे होता. या प्रकरणाचा तपास आता एनआयए करत आहे. त्यामुळे एनआयएही त्यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. मनसुख यांच्या पत्नीने जबाबात वाझे यांनीच पतीची हत्या केल्याचा आराेप केला.  

स्वत: गैरहजर, वकिलांनी मांडली बाजूअटक टाळण्यासाठी वाझेंनी १२ मार्चला न्यायालयात अर्ज केला. त्यावर १३ मार्चला झालेल्या सुनावणीस ते स्वत: हजर नव्हते. त्यांच्या वकिलांचे म्हणणे ऐकून न्यायालयाने तत्काळ अटकपूर्व जामीन देण्यास नकार देऊन पुढील सुनावणी १९ मार्च रोजी ठेवली.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेPoliceपोलिसCourtन्यायालयMansukh Hirenमनसुख हिरण