शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार प्रकरणातून वाझेची सुटका नाहीच; विशेष न्यायालयाने फेटाळला अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2023 06:08 IST

अनिल देशमुखांशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात वाझे ‘माफीचा साक्षीदार’ झाला, मात्र...

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणातून औपचारिक सुटका करण्याचा निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेचा अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी फेटाळला. या प्रकरणात माफीचा साक्षीदार झाल्याने त्याने आपल्यावरील आरोप वगळण्यात यावे व प्रकरणातून सुटका करण्याची विनंती वाझेने अर्जाद्वारे न्यायालयाला केली होती.

अनिल देशमुखांशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात वाझे ‘माफीचा साक्षीदार’ झाला. मात्र, तो अद्यापही न्यायालयीन कोठडीत आहे तर देशमुख व अन्य आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. ‘अन्य आरोपी जामिनावर बाहेर आले आहेत. मात्र, मी अजूनही कोठडीत आहे. सीबीआयने  खटला मजबूत करण्यासाठी मला माफीचा साक्षीदार केले. परंतु, वागणूक आरोपीप्रमाणे मिळत आहे,’ असे वाझेने अर्जात म्हटले आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर  १०० कोटी रुपये वसुली रुपयांचा आरोप केला. देशमुखांनी मुंबईच्या बार व रेस्टॉरंट  मालकांकडून  १०० कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट मुंबई पोलिसांना दिल्याचा आरोप सिंग यांनी केला. त्याआधारे सीबीआयने देशमुख यांच्यासह वाझे व अन्य काही जणांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला.

सीबीआयचा युक्तिवाद काय?

वाझेला न्यायालयात आरोपी म्हणून हजर करण्यात आले होते. न्यायालयात हजर केलेला आरोपी हा न्यायालयाने त्याला निर्दोष सोडेपर्यंत किंवा आरोपमुक्त करेपर्यंत आरोपीच राहतो. सीआरपीसीअंतर्गत न्यायालयाला आरोपीला माफीचा साक्षीदार करण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ आरोपीला आरोपमुक्त  करावे असा होत नाही, असा युक्तिवाद सीबीआयने न्यायालयात केला.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेCourtन्यायालयAnil Deshmukhअनिल देशमुखCorruptionभ्रष्टाचार