शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
2
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
3
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
5
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
6
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
7
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
8
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
9
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
10
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
11
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
12
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
13
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
14
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
15
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
16
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
17
भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...
18
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
19
Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
20
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

९० लाखांची चोरी, 'मास्टरमाईंड' नोकरच निघाला; सीक्रेट लॉकरची माहिती अन् रचला 'तो' भयानक कट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 14:54 IST

पोलिसांनी आरोपींकडून सोने-चांदीचे दागिने, महागडे आयफोन आणि तीन लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.

मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळ शहराला हादरवून सोडणाऱ्या ९० लाख रुपयांच्या हाय-प्रोफाइल चोरीचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, या चोरीचा मास्टरमाईंड हा त्याच घरात काम करणारा माजी केअरटेकर असल्याचे उघड झाले आहे. आयएमईआय नंबरने पोलिसांना या तपासात मोठे यश मिळवून दिले आहे.

पोलिसांनी आरोपींकडून सोने-चांदीचे दागिने, महागडे आयफोन आणि तीन लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. जप्त केलेल्या ऐवजाची किंमत अंदाजे ७० लाख रुपये इतकी आहे.

चोरी कधी आणि कुठे झाली?

भोपाळमधील हबीबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोका सोसायटी, अरेरा कॉलनी येथे ही घटना घडली होती. आर्किटेक्ट मनीष ब्यौहार हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत मुंबईत राहतात. त्यांनी जुलै २०२५ मध्ये आपल्या अरेरा कॉलनीतील घरात सोने-चांदीचे लाखो रुपयांचे दागिने ठेवले होते. ते २२ नोव्हेंबर रोजी भोपाळला परतले तेव्हा त्यांना चोरी झाल्याचे समजले.

नोकरानेच रचला 'गुप्त लॉकर' लुटण्याचा कट!

चोरीच्या तपासासाठी पोलिसांनी ४० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. सुरवातीला पोलिसांना हा बाहेरच्या टोळीचे काम वाटले, पण तांत्रिक पुरावे आणि फुटेजमुळे धक्कादायक सत्य समोर आले. सोहित उर्फ ​​कल्लू हा ब्यौहार यांच्याकडे २०२३ पर्यंत केअरटेकर म्हणून काम करत होता. सोहितने कामावर असताना घरातील गुप्त लॉकर पाहिले होते. ही गुप्त माहिती वापरून सोहितने सध्याच्या केअरटेकरचा नातेवाईक असलेल्या रवी सोनी याच्यासोबत चोरीचा संपूर्ण कट रचला.

२९ जुलैच्या रात्री रवी आणि सोहितने नियोजनबद्ध पद्धतीने बाउंड्री वॉलवरून चढून पहिल्या मजल्यावर प्रवेश केला आणि लॉकरमधील रोख रक्कम व दागिने घेऊन पोबारा केला. आरोपींनी चोरी करण्यापूर्वी अनेक वेळा घराची रेकी केली होती.

IMEI नंबरने पकडले गेले आरोपी!

चोरी केल्यानंतर आरोपींनी सहा वेळा आपले ठिकाण बदलले. पोलीस आरोपींचा माग काढत असताना त्यांना महत्त्वाचा सुगावा लागला. आरोपी रवीने चोरीच्या पैशातून एक नवीन मोबाइल खरेदी केला होता. पोलिसांनी या नवीन मोबाइलच्या आयएमईआय नंबरच्या आधारे आरोपींचे लोकेशन शोधले आणि गुना येथून रवी सोनी, राजू सोनी आणि सोहित उर्फ ​​कल्लू या तिघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याची बिस्किटे, बांगड्या, गोल्ड मेडल, चेन आणि ३ लाख रुपये रोख तसेच चोरीच्या पैशांतून खरेदी केलेला आयफोन जप्त केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : ₹9 Million Theft: Insider Job Unveiled, Caretaker the Mastermind

Web Summary : Bhopal theft solved! Ex-caretaker masterminded the ₹9 million robbery, exploiting secret locker knowledge. Police recovered gold, iPhones, and cash, arresting three. IMEI tracking was key.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश