शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएसयूपी’ घरांमधील साहित्याची चोरी, नागरिकांनी काढला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 01:36 IST

Crime News : केडीएमसीने केंद्र सरकारच्या बीएसयूपी योजनेंतर्गत बांधलेल्या घरांमधील नळ, किचनच्या लाद्या, खिडक्यांचे स्लाइडिंग, दरवाजे चोरीला गेल्याची घटना घडकीस आली आहे.

कल्याण : केडीएमसीने केंद्र सरकारच्या बीएसयूपी योजनेंतर्गत बांधलेल्या घरांमधील नळ, किचनच्या लाद्या, खिडक्यांचे स्लाइडिंग, दरवाजे चोरीला गेल्याची घटना घडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडीओ नागरिकांनी बनवून तो मनपा प्रशासनास सादर केला आहे. या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मनपा आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी  अधिकाऱ्यांना दिले आहेत.पूर्वेतील न्यू गोविंदवाडी परिसरात मनपाने ‘बीएसयूपी’तून घरे बांधली आहेत. त्यातील काही घरांचे लाभार्थ्यांना वाटप केले आहे, तर काहींचे वाटप न झाल्याने ती धूळखात पडली आहेत. त्यातील नळ, किचनच्या लाद्या, दरवाजे, खिडक्यांचे स्लाइडिंग चोरट्यांनी चोरण्याचा सपाटा लावला आहे. त्याचा व्हिडीओ नागरिकांनी काढून मनपास पुरावा म्हणून सादर केला आहे. या प्रकरणी आयुक्तांना विचारताच ते म्हणाले, चोरीच्या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले आहेत.केंद्रातील यूपीए सरकारच्या काळात मनपाने शहरातील गरिबांसाठीच्या ‘बीएसयूपी’तून सात हजार घरे बांधली.  त्यातील १,४५० घरांचे लाभार्थ्यांना वाटप केले आहे. उर्वरित तीन हजार घरे ही पंतप्रधान आवास योजनेत रूपांतरित केली आहेत. मात्र, पुढील कार्यवाही झालेली नाही. रेल्वेच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पात बाधित होणाऱ्या ८४० जणांना घरे देण्यात आली आहेत. त्या बदल्यात महापालिकेस रेल्वेने घरांचे पैसे दिले आहेत. त्या व्यतिरिक्त २,७१० घरे शिल्लक असून, ती धूळखात पडली आहेत. त्यांच्यासाठी लाभार्थी निश्चित केलेले नाहीत. मनपाच्या रस्ते विकास प्रकल्पात बाधित होणाऱ्यांना ही घरे देण्यात येणार आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याण