शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

गॅंगस्टर बिश्नोईच्या संपर्कात युवक, जीवंत काडतुसांसह दोन पिस्तूल हस्तगत

By नितिन गव्हाळे | Updated: February 4, 2024 15:37 IST

अकोट शहर पोलिसांची कारवाई, तिघांना अटक

अकोट: गॅगस्टर लॉरेन्स बिश्नोई सारख्या दिसणा-या व्यक्तीसोबत व्हिडीओ कॉल, त्याचा भाउ अनमोल बिश्नोई याचे सोबत ऑडीओ कॉल तसेच इंटरनॅशनल नंबरवरून कॉल करून संपर्कात असलेल्या एका युवकासोबत आणखी दोघांना अकोट शहर पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून ९ जीवंत काडतुसांसह दोन पिस्तूल हस्तगत केले आहेत.

पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे हे १६ जानेवारी २०२४ रोजी गुन्हे शोध पथकासह पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमी मिळाली की, दोन युवक हे अकोट-अकोला रोडवर अकोला नाक्याचे पुलाखाली मोटरसायकल घेवुन उभे असुन त्यांच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तूल आहेत. माहितीनुसार घटनास्थळावर जावुन त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याजवळ एक खाली मॅक्झिन मिळून आल्याने त्यांना विचारपूस करून त्यांनी विहिरीत टाकलेले देशी बनावटीच्या दोन पिस्तूल आणि ९ जिवंत राऊंड वीर एकलव्य आपात्कालीन पथकाच्या मदतीने पंचांसमक्ष विहीरीतून बाहेर काढले. 

यातील आरोपी अजय तुलाराम देठे(२७) रा. धोबीपुरा अकोट, प्रफुल्ल विनायक चव्हाण(२५) रा. अडगाव बु. ता. तेल्हारा जि. अकोला यांना मोटरसायकलसह ताब्यात घेतले. त्यांच्याविरुदधकलम ३,२५ आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला. यातील दोन्ही आरोपींनी गुन्ह्याच्या तपासात मास्टरमाइंड असलेला तिसरा आरोपी शुभम रामेश्वर लोणकर(२५) रा. नेवरी ता. अकोट, ह.मु. भालेकर वरती, वारजे, पुणे निष्पन्न करून त्याचा उजैन मध्यप्रदेश येथे जावुन शोध घेतला असता तो तेथुन पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी त्यास भालेकर वस्ती, वारजे, पुणे येथुन ३० जानेवारी रोजी अटक करून त्यास अकोट न्यायालयात हजर केले असता त्याला तीन पोलिस कोठडी मिळाली.

एक आरोपी गॅंगस्टरच्या संपर्कात असल्याचे निष्पन्नतपासा दरम्यान आरोपी शुभम लोणकर याचे मोबाईलवरून गॅगस्टर लॉरेन्स बिश्नोई सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीसोबत व्हिडिओ कॉल, त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्यासोबत ऑडिओ कॉल तसेच इंटरनॅशनल नंबरवरून कॉल केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन अकोट शहर व स्थानिक गुन्हे शाखा अकोला करीत आहे. ही कारवाई अकोटचे एसडीपीओ अनमोल मित्तल, एलसीबीचे प्रमुख शंकर शेळके, पोलीस निरीक्षक तपन कोल्हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी