शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीची हत्या करून फरार झालेल्या तरुणानेही संपवलं जीवन; आईच्या मृतदेहाशेजारी रडत होतं लहान बाळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 11:50 IST

३१ डिसेंबर रोजी गौरवची पत्नी घरात मृतावस्थेत आढळून आली. तेव्हापासून तो फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते.

नवी दिल्ली : गुरुग्राम येथे राहणाऱ्या एका तरुणाने काल उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील मेट्रो स्टेशनवरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गौरव शर्मा असं आत्महत्या केलेल्या २३ वर्षीय तरुणाचं नाव आहे. गौरव याच्यावर त्याच्या पत्नीची हत्या केल्याचा संशय होता. कारण ३१ डिसेंबर रोजीच त्याची पत्नी घरात मृतावस्थेत आढळली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा उत्तर प्रदेशातील आग्रा येथील असणारा गौरव शर्मा हा आपल्या पत्नी आणि मुलासह गुरुग्राम येथील डीएलएफ परिसरातील एका इमारतीत वास्तव्यास होता. सहा महिन्यांपूर्वीच ते या घरात राहण्यासाठी आले होते. मात्र ३१ डिसेंबर रोजी गौरवची पत्नी घरात मृतावस्थेत आढळून आली. तेव्हापासून तो फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते.

अटकेच्या भीतीने धास्तावलेला गौरव शर्मा काल सकाळी साडेदहा वाजता कौशांबी मेट्रो स्थानकावर पोहोचला आणि त्याने रेलिंगवरून खाली उडी घेत आपलं जीवन संपवलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

आईच्या मृतदेहाशेजारी आढळलं लहान मूल! 

पत्नीच्या हत्येनंतर गौरव शर्मा घरातून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस डीएलएफ परिसरातील दाखल झाले. तेव्हा त्यांना घरात गौरवच्या पत्नीचा मृतदेह आढळून आला. तर त्यांचं लहान मूल आपल्या आईच्या मृतदेहाशेजारी रडत असल्याचं दिसून आलं. 

दरम्यान, गौरवने त्याच्या पत्नीची कोणत्या कारणामुळे हत्या केली, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारCrime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली