शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत टीसीची नोकरी देण्याचे सांगून तरुणास १२ लाख ४० हजारांना गंडवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 23:17 IST

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निखिल चव्हाण व पथकाने ठाण्याच्या कासारवडवली येथे रहात असलेल्या समीर कादरी याला अटक केली .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - रेल्वेत टीसीची नोकरी लावण्याचे आमिष देऊन तरुणास १२ लाख ४० हजारांना फसवल्या प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी एकास अटक केली असून चौघांचा शोध सुरु आहे . आरोपींनी तरुणास टी सी चा गणवेश पासून बनावट नियुक्तीपत्र सुद्धा दिले होते . 

कांदिवलीच्या पोईसर भागात राहणाऱ्या भरत नारायण झा वय २८ वर्ष युवकाला थेट पद्धतीने रेल्वेत टि. सी. ची नौकरी लावतो सांगून असे त्यावेळी काशीमीराच्या मुन्शी कंपाउंड मध्ये राहणाऱ्या समीर कादरी याने २०१८ सालात सांगितले होते . त्यावेळी समीर ने दिड लाख रुपये टोकन म्हणून घेतले . 

झा याला लखनौच्या रेल्वे मेडिकल सेंटर येथे बोलावून तेथील खान नावाच्या इसमाने वॉर्ड बॉय मार्फत रक्ताचे नमुने तपासणी साठी घेतले . मेडिकल मध्ये पास झाल्याने पुढील कार्यवाही करिता समीर याने आणखी २ लाख घेतले . त्या नंतर रेल्वेत नोकरीसाठी विविध कारणांनी वेळोवेळी समीर सह खान , पांडे , सौरभ उर्फ मनोज यादव , धीरजकुमार सिंग यांनी एकूण १२ लाख ४० हजार उकळले . 

झा याला उत्तर प्रदेश,  दिल्ली येथे अनेक खेपा मारायला लावून रेल्वेच्या विविध कार्यालय परिसरात बोलावले . त्याला बनावट नियुक्ती पत्र , ओळखपत्र  देण्या पासून टी सी चा गणवेश सुद्धा दिला . मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर झा याच्या फिर्यादी वरून काशीमीरा पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल केला . 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निखिल चव्हाण व पथकाने ठाण्याच्या कासारवडवली येथे रहात असलेल्या समीर कादरी याला अटक केली . तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे . तर उर्वरित चार आरोपींचा पोलीस शोध घेत असून ते उत्तर प्रदेश , बिहार आदी भागात असल्याचे सांगितले जाते . 

टॅग्स :railwayरेल्वे