शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
3
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
4
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
5
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
6
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
7
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
8
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
9
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
10
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
11
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
12
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
13
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
14
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
15
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
16
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
17
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
18
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
19
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
20
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम

एकतर्फी प्रेमातून युवकानं प्रेयसीच्या अल्पवयीन भावाला संपवलं; नाशिकमधील प्रकार

By अझहर शेख | Updated: September 11, 2022 05:41 IST

पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कालिकानगरमध्ये राहणारा रवी सय्यद हा मोलमजुरीची कामे करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.

नाशिक : एकतर्फी प्रेमापोटी प्रियकराने भेटण्यासाठी बळजबरी करत काही दिवसांपुर्वी धमकावले होते. यानंतर संशयिताने चॉपरने प्रेयसीच्या १७वर्षीय भावावर पंचवटीतील कालिकानगरमध्ये शनिवारी (दि.९) रात्री हल्ला चढविला. वर्मी घाव बसल्याने रवी सलीम सय्यद (१७) याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा शासकीय रुग्णालयात नातेवाईकांसह परिसरातील रहिवाशांनी गर्दी केली होती.

पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कालिकानगरमध्ये राहणारा रवी सय्यद हा मोलमजुरीची कामे करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याचे वडील सलीम सय्यद हे गोदाकाठ परिसरात आले असताना रवी हा गल्लीत बसलेला हाेता. यावेळी दोघे संशयित हल्लेखोर तेथे आले व त्यांनी जुन्या वादाची कुरापत काढत रवीवर चॉपरसारख्या धारधार शस्त्राने हल्ला चढविला. ही घटना शनिवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर जखमी अवस्थेत रवी यास जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून जिल्हा शासकिय रुग्णालयात हलविण्यास सांगितले. तेथे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी रवी यास तपासून मयत घोषित केले.

रवीच्या कमरेच्या बाजूने पोटात शस्त्राचा वर्मी घाव लागला. संशयितांना जोपर्यंत अटक केली जाणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भुमिका नातेवाईकांनी घेतली. नातेवाईक महिला व परिसरातील रवीचे मित्रांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हा शासकिय रुग्णालयात धाव घेतली. संशयित हल्लेखोरांच्या शोधार्थ त्वरित पंचवटी गुन्हे शाेध पथकासह मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पथक रवाना झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. याबाबत रात्री उशीरापर्यंत पंचवटी पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला.