शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

थरारक! ८ दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने पतीला जिवंत जाळलं, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 19:57 IST

जेवणानंतर सगळे लोक झोपले होते. बेशुद्धीचं औषध दिल्याने कुणीही जागं नव्हते.

एटा - आठ दिवसांपूर्वी लग्न करून आलेल्या नवविवाहितेने तिच्या पतीला जिवंत जाळण्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. या घटनेत पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. घरच्यांनी बळजबरीनं माझे लग्न लावलं त्यामुळे पतीलाच मारून टाकल्याचा हैराण करणारा खुलासा आरोपी पत्नीने केला आहे. मात्र युवकाच्या घरी शोककळा पसरली आहे. 

हसनपूर गावातील हा धक्कादायक प्रकार आहे. याठिकाणी बुधवारी रात्री दुष्यंत कुमार चौहानला जाळून मारल्या प्रकरणी पोलिसांनी नवविवाहिता संजना आणि तिचा प्रियकर या दोघांना अटक केली आहे. पोलीस चौकशीत आरोपी पत्नीनं सांगितले की, मी दुसऱ्यावर प्रेम करत होती. मात्र घरच्यांनी बळजबरीनं माझे लग्न लावून दिले. त्यामुळे पतीला मारून टाकण्याचा प्लॅन प्रियकर आणि पत्नीने मिळून केला. प्लॅननुसार पतीला जिवंत जाळण्यात आले. या घटनेनंतर दुष्यंतच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली आहे. 

दुष्यंतच्या पहिल्या पत्नीची मुलगी सौम्याने सांगितले की, आईनं हत्या करण्यापूर्वी आमच्या सर्वांच्या जेवणात नशेचं औषध दिले होते. युवक एका कंपनीत कारचालक म्हणून काम करायचा. तो कामावरून रात्री ९ वाजता घरी परतला. त्यानंतर त्यालाही बेशुद्धीचं औषध देण्यात आलं. हत्येचं प्लॅनिंग आधीच ठरलं होते. आरोपी पत्नीने रचलेल्या कटानुसार बेशुद्ध करून पतीला जिवंत जाळले. 

जेवणानंतर सगळे लोक झोपले होते. बेशुद्धीचं औषध दिल्याने कुणीही जागं नव्हते. परंतु छोट्या मुलीनं शुद्धीत आल्यानंतर पाहिले की एक व्यक्ती घरात आला होता तो जिन्यावरून टेरेसवर चढला होता. रविपाल सिंह यांचा दुष्यंत कुमार सिंह हा एकुलता एक मुलगा होता. २०१३ मध्ये त्याचे पहिले लग्न झाले होते. पहिल्या लग्नापासून त्याला ४ मुले आहेत. त्यात सौम्या(१०), छवि(७), शौर्य(५), वीर(२) वर्षाचा आहे. पहिली पत्नी मांडवीने मे २०२२ रोजी कौटुंबिक कलहामुळे विष पिऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर या घटनेतून कुटुंब सावरत होते. गावातील शिवकुमार सिंह यांनी त्यांच्या सासरकडील संजना नावाच्या मुलीचं दुष्यंत कुमार सिंह सोबत २३ जानेवारीला लग्न केले. ती पहिल्यांदा सासरी आली होती. कुणाचीही जास्त बोलत नव्हती. मात्र तिने केलेल्या या कृत्यामुळे कुटुंबामध्ये संताप व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी