शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धेच्या घरात लाखोंच्या दागिन्यांची चोरी, दाम्पत्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 12:52 IST

तक्रारदार लीना मटानी (७९) या कफ परेडच्या कासाब्लांका इमारतीत एकट्याच राहतात.

मुंबई : कफ परेड परिसरात एकट्या राहणाऱ्या वृद्धेच्या घरातून लाखोंचे दागिने लंपास करण्यात आले. या प्रकरणी तिने तिच्या घरी काम करणाऱ्या दोन मोलकरणींवर गुन्हा दाखल केला. दरम्यान, रूबिका, तिचा पती रवी यांना अटक करण्यात आली आहे.

तक्रारदार लीना मटानी (७९) या कफ परेडच्या कासाब्लांका इमारतीत एकट्याच राहतात. त्यांच्या पतीचे १० जून २०२० रोजी निधन झाले. त्यांच्याकडे घरकामासाठी रूबिका (२२) नावाची महिला जानेवारी, २०२३ मध्ये येऊ लागली. मात्र, नंतर ती गरोदर राहिल्याने तिने २६ मे रोजी तब्येतीचे कारण देत नोकरी सोडली. त्यानंतर तिने मयूरी (३५) या महिलेला घरकामासाठी ठेवले.

मयूरीने कामाला सुरुवात केली; त्यानंतर ३० मे रोजी तब्येत ठीक नसल्याने ती कामावर येणार नसल्याचे मटानी यांना कळवले. तेव्हा मटानी यांनी तिला दोन दिवस आराम करायला सांगितले. पुढे तिने ३ ते ६ जूनपर्यंत वेळेवर काम केले आणि ती निघून गेली. मात्र, ७ जून रोजी ती उशिरा कामावर आली. त्यामुळे मटानी यांनी तिला त्याबाबत विचारणा केली. तेव्हा तिने अन्य कुठेतरी जेवण आणि नाश्ता बनविण्याचे काम घेतले असल्याने तसेच तिच्या मालकाच्या घरी पाहुणे असल्याने उद्यापासून फक्त भांडी घासण्याचे काम करणार असल्याचे मटानी यांना म्हणाली. 

  मटानी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या घरात असलेल्या मास्टर बेडरूममध्ये त्यांचे दागिने आणि अन्य मौल्यवान वस्तू ठेवलेल्या असून, त्यांचा वापर त्या करीत नाहीत.   त्या वस्तू ठेवलेल्या कपाटाची चावीही त्यांच्याकडे आहे. त्या कपाटातील जवळपास १७ लाख १५ हजारांचे दागिने त्यात नसल्याने त्यांनी बँकेच्या लॉकरमध्ये जाऊन तपासले. मात्र, तिथेही दागिने नव्हते.   त्यावरून त्यांना रूबिका किंवा मयूरी यांनी ही चोरी केली असल्याचा संशय आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी