शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिकेने चिमुरड्याला ठेवले बांधून, कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 06:32 IST

संबंधित शिक्षिकेवर कारवाईची मागणी त्यांनी एका पत्राद्वारे केली असून याबाबत नाैपाडा पाेलिस ठाण्यात तक्रारही दिली आहे.

ठाणे : पाचपाखाडीतील प्रतिष्ठित युरो किड्स या शिशुवर्गाच्या शाळेतील शिक्षिकेने तीन वर्षांच्या चिमुरड्याला ओढणीने बांधल्याचा प्रकार सीसीटीव्हीतही कैद झाल्याचा दावा चिमुरड्याचे वडील दिनेश शेट्टीगर यांनी केला आहे. तसेच शिक्षिकेने पुन्हा बांधण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. संबंधित शिक्षिकेवर कारवाईची मागणी त्यांनी एका पत्राद्वारे केली असून याबाबत नाैपाडा पाेलिस ठाण्यात तक्रारही दिली आहे. शेट्टीगर यांचे हे पत्र शनिवारी सोशल मीडियावरही व्हायरल झाले. या पत्रात त्यांनी आपल्या आहान दिनेश शेट्टीगर या मुलावर गुदरलेल्या प्रसंगाची माहिती दिली. पाचपाखाडीतील या प्ले स्कूलमध्ये १६ जून रोजी दुपारी २ वाजता आहानची आई त्याला घेण्यासाठी शाळेत गेली. तेव्हा त्याच्या वागण्यात बदल झालेला दिसला. शिक्षिका प्राजक्ता पठारे यांनी त्याला बांधून ठेवल्याचे सांगितले. त्या शिक्षिका ओरडतात. त्यामुळे शाळेतच जायचे नाही, असा पवित्रा आहान याने घेतल्याने शेट्टीगर यांना धक्का बसला. शेट्टीगर यांनी शाळेच्या प्रमुख निवेदिता मुखर्जी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी मुलाला बांधले नव्हते तर केवळ हात पकडून ठेवले होते, असा दावा केला. शेट्टीगर यांनी सीसीटीव्ही चित्रण पाहिले. तेव्हा शिक्षिकेने आहानला हाताने फटका मारल्याचे तसेच दोनदा ओढणीने बांधल्याचे दिसले. यासंदर्भात शाळेच्या प्रभारी निवेदिता यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला.या शिक्षिकेवर कारवाईचे आश्वासन निवेदिता यांनी दिल्याचेही शेट्टीगर यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी