शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीनं घेतला अपमानाचा बदला! प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 15:23 IST

या प्रकारामुळे पोलिसांना संशय येऊ लागला आणि संशयाची सुई थेट शिवानीकडे गेली.

गाझियाबाद - पती त्याच्या पत्नीसह आरामात बेडवर झोपला होता. पण त्याला कल्पना नव्हती की आजची रात्री त्याच्या आयुष्यातील शेवटची रात्र असेल. बेडवर एकत्र झोपलेल्या पत्नीने तिच्या प्रियकराला फोन लावला. तू लवकर ये, आज याच्यापासून कायमची सुटका होईल असं सांगताच थोड्याच वेळात खोलीत गोळीबाराचा आवाज घुमतो. गाझियाबादमधील या भयंकर घटनेची कहानी पत्नीनं लिहिली होती जिला थप्पडचा बदला मृत्यूनं घ्यायचा होता. 

नंदग्राम परिसरात शिवानी नावाच्या महिलेने पोलिसांना फोन करून पतीने आत्महत्या केल्याचे सांगितले. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. कपिल चौधरीचा मृतदेह तिथेच पडला होता, जवळच एक पिस्तूल ठेवले होते. कपिलच्या डोक्याच्या डाव्या बाजूला गोळी लागली. पोलिसांनी तपास सुरू केला, गोळी खूप जवळून सोडण्यात आल्याचे स्पष्ट झाले. मग त्या रात्री कपिलने खरच आत्महत्या केली होती का? कपिलची पत्नी शिवानी जोरजोरात रडत होती. पतीच्या निधनाने शोक करीत होती.

पतीची हत्या करून आत्महत्येचा बनावपोलीस तपास जसा पुढे गेला तसा कपिल हा राइट हँडर होता मग त्याने डाव्या हाताने हाताने पिस्तूल कसे धरले आणि डोक्याच्या डाव्या बाजूने गोळी झाडली हा प्रश्न उभा राहिला. या प्रकारामुळे पोलिसांना संशय येऊ लागला आणि संशयाची सुई थेट शिवानीकडे गेली. पोलिसांनी शिवानीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. तिचे कॉल डिटेल्स काढले असता धक्कादायक खुलासे झाले.

दारूच्या नशेत बुडवून पतीला संपवलंशिवानी अंकुश नावाच्या मुलाशी रोज तासनतास बोलायची. कपिल चौधरीचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आला असून त्याला गोळी झाडण्यापूर्वी ड्रग्ज देण्यात आल्याचे समोर आले आहे. हत्या झाली तेव्हा कपिल दारूच्या नशेत होता. त्याच्यासोबत काय घडतंय हे त्याला कळत नव्हतं. पोलिसांनी शिवानी आणि अंकुशला अटक केली.

प्रियकरासह मिळून पतीची हत्याअंकुश जवळच मोबाईल शॉपी चालवायचा. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी करून संपूर्ण घटना सांगितली. त्या रात्री शिवानीने पतीला अंमली पदार्थ मिसळून जेवण दिले आणि नंतर दोघेही झोपी गेले.  कपिल जेव्हा गाढ झोपेत गेला तेव्हा तिने आपल्या प्रियकराला घरी बोलावले आणि पतीला गोळ्या घालण्यास सांगितले, मग शिवानीच्या सांगण्यावरून अंकुशने तेच केले. नंतर खून हा आत्महत्येचा भास व्हावा यासाठी दोघांनी बंदूक तिथेच ठेवली.

थप्पडचा बदला खूनाने घेतलाशिवानी जेलमध्ये एकामागून एक किस्से सांगत होती. शिवानीने सांगितले की, कपिल तिला खूप मारायचा. त्याच्याकडून तिला रोज मारहाण व्हायची आणि त्यानंतरच तिचे अंकुशसोबत संबंध सुरू झाले. ती कपिलचा तिरस्कार करू लागली म्हणून त्याला संपवण्याचा कट रचला. शिवानीनं प्लॅनिंगनुसार कपिलची आत्महत्या भासावी यासाठी प्लॅन केला. मात्र पोलिसांनी तपासात हे सर्व बाहेर काढले त्यामुळे शिवानी आणि अंकुश दोघेही आज तुरुंगात आहेत.