शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंच्या घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना मिळाले यश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2023 19:09 IST

विरारच्या गोकुळ टाऊनशिप रोडवरील विठ्ठल हेव्हन या इमारतीमध्ये राहणाऱ्या भरत कांतीलाल रावल (६२) यांच्या घरी ११ ऑगस्टला लाखोंची घरफोडी झाली होती.

- मंगेश कराळे

नालासोपारा : अर्नाळा पोलीस ठाण्यात १० लाखांच्या झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याची गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी उकल केली आहे. या गुन्ह्यातील १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला असून एका आरोपी महिलेला अटक करण्यात आले आहे तर एका फरार सराईत आरोपीचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी गुरुवारी दिली आहे.

विरारच्या गोकुळ टाऊनशिप रोडवरील विठ्ठल हेव्हन या इमारतीमध्ये राहणाऱ्या भरत कांतीलाल रावल (६२) यांच्या घरी ११ ऑगस्टला लाखोंची घरफोडी झाली होती. चोरट्याने घराच्या सेफ्टी डोअरला लागून असलेल्या दरवाजाचे लॉक तोडून दोन लोखंडी कपाट व तिजोरी फोडून सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण १० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केला होता. अर्नाळा पोलिसांनी १२ ऑगस्टला घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. मिरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालय परिसरात गेल्या काही महिन्यापासून दिवसा घरफोडी चोरीच्या प्रकारात वाढ झाल्याने सदर घटनांची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवुन आरोपीत यांचा शोध घेवुन पायबंद करणे बाबत सुचना दिल्या होत्या.

त्याअनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व आदेशान्वये सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे व आरोपीतबाबत मिळालेल्या गोपनीय बातमीवरुन महिला आरोपी मिनता वसंत राजभर, राहणार डोंबिवली येथून बुधवारी ताब्यात घेवुन तिच्याकडे तपास केला. आरोपी महिलेकडून गुन्हयातील ९ लाख ८४ हजार ७७ रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागीने व रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक महिला आरोपीला सदरचा मुद्देमाल घरफोडी चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीताने दिले असल्याचे निष्पन्न होत असुन त्याचा याचा शोध सुरु आहे.  सदर कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत भुपेंद्र टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, मसुब सागर सोनवणे, गणेश यादव, प्रविण वानखडे, नालासोपारा पोलीस ठाण्याचे होमगार्ड रुपाली विलास आवाडे, आणि सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी