शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बनले आई! तीन वर्षाच्या मुलाला पाजले दूध अन् कडेवर घेऊन फिरवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 21:09 IST

Police News : दोघेही एकटेच बोलायला गेले असता त्यांनी तेथून पळ काढला आणि त्यांच्या 3 वर्षाच्या मुलाला तिथेच सोडून दिले.

पंचकुला - हरियाणातील पंचकुला जिल्ह्यात एका 3 वर्षाच्या मुलाला त्याच्या पालकांनी पोलिस स्टेशनमध्ये सोडून पळ काढला. वास्तविक, पंचकुलातील मोरनीच्या गावातील कोलयो येथील एक पती-पत्नी त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी महिला पोलीस ठाण्यात पोहोचले होते. एसआय रीता देवी यांनी त्यांना सांगितले की, तुम्ही पती-पत्नी दोघांनी एकदा बाहेर जाऊन एकांतात बोला. मात्र दोघेही एकटेच बोलायला गेले असता त्यांनी तेथून पळ काढला आणि त्यांच्या 3 वर्षाच्या मुलाला तिथेच सोडून दिले.एसआय रीता यांनी सांगितले की, आम्ही दिवसभर मुलाच्या पालकांना फोन करत राहिलो, परंतु दोघेही मुलाला घेण्यासाठी पोलिस ठाण्यात आले नाहीत. आश्‍चर्याची बाब म्हणजे त्या 3 वर्षाच्या चिमुकल्याला महिला ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी दिवसभर चोख सांभाळ ठेवला होता. त्या मुलासाठी दुधाच्या बाटलीची व्यवस्था करण्यात आली होती. काही वेळाने मुलानेही चॉकलेटची मागणी करण्यास सुरुवात केली. तर मुलासाठी चॉकलेट आणि काही खेळणीही आणली होती.मुलाने जी मागणी केली, तीच वस्तू बाजारातून आणली. एवढेच नाही तर मुलाने पोलिसांच्या टोप्या घालण्याचा हट्टही केला. ज्यावर महिला पोलिस स्टेशनच्या SHO नेहा चौहान यांनी आपली टोपी काढून मुलाच्या डोक्यावर ठेवली आणि मुलही खूप आनंदी झाले.जेव्हा ही बाब पंचकुलाचे डीसीपी मोहित हांडा आणि पंचकुलाचे आयुक्त सौरव सिंह यांच्या निदर्शनास आली तेव्हा त्या मुलाच्या पालकांना कडक शब्दात समज देऊन पाचारण करण्यात आले. त्याची आई मुलाला घ्यायला पोहोचली नाही पण त्याचे वडील नक्कीच आले. जननायक जनता पक्षाचे नेते अजय गौतम आणि सुदेश राणी यांनी मुलाच्या वडिलांना पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी रात्री उशिरा मुलाला त्याच्या वडिलांकडे परत केले.

टॅग्स :PoliceपोलिसHaryanaहरयाणा