शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

प्रेयसीचा खून करून पसार झालेल्या प्रियकराला पोलिसांनी केली अटक!

By नितीन पंडित | Updated: September 21, 2023 15:38 IST

शब्बीर दिलावर शेख असे अटक केलेल्या प्रियकर आरोपीचे नाव आहे.

भिवंडी : लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या प्रियसीची हत्या करून परराज्यात पळून गेलेल्या प्रियकरास कोनगाव पोलिसांनी अवघ्या तीस तासात अटक केली आहे. प्रियसीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून ही हत्या केल्याची माहिती पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी गुरुवारी घेयलेल्या पत्रकार परिषदेत दिली. शब्बीर दिलावर शेख असे अटक केलेल्या प्रियकर आरोपीचे नाव आहे.

१८ सप्टेंबर रोजी कोनगाव याठिकाणी गणेशनगर येथील एका खोलीतून दुर्गंधी येत असल्याने त्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाल्यानंतर सदर ठिकाणी एका महिलेची धारदार हत्याराने हत्या झाल्याचे उघड झाले होते.महिलेच्या मैत्रिणीने दिलेल्या तक्रारी वरून हत्येचा गुन्हा नोंदवून पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे,सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार व कोनगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मयत मधू प्रजापती हिच्या मैत्रिणीकडे केलेल्या चौकशीत मधू हीचा मित्र शब्बीर दिलावर शेख यांचे नाव समोर आले. त्याच्या मोबाईलचा तांत्रिक तपास करून तो काम करत असलेल्या अंबरनाथ येथील कंपनीमधील त्याच्या सहकाऱ्यांकडे माहिती घेतली असता तो पश्चिम बंगाल राज्यात पळून गेल्याचे निष्पन्न झाले. 

त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव चुंबळे, विनोद कडलग,पोलिस उपनिरीक्षक उबाळे,अस्लेशा घाटगे,निलेश वाडकर,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निता पाटील,पोलिस हवालदार उदमले,अरविंद गोरले,जगदिश पाटील,सुनिल पाटील,घोडसरे, पोलीस नाईक नरेंद्र पाटिल,पोलीस शिपाई दिगांबर तुपकर, राहुल वाकसे, हेमराज पाटिल, कुशल जाधव, खडसरे,गायकवाड,साळुंखे हे पोलिस पथक आरोपी शब्बीरच्या शोधासाठी पश्चिम बंगाल राज्यातील त्याच्या मूळगावी गेले.स्थानिक पश्चिम बंगाल येथील पोलिसांच्या मदतीने  तपास केला असता तो सासुरवाडी येथे निघून गेल्याचे समजताच पश्चिम बंगाल येथील सारापुला जिल्हा २४ परगणा येथे लपून बसलेल्या शब्बीर यास ताब्यात घेतले.पुढील तपास पोलीस निरीक्षक दीप बने हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी