शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! वृध्दाने पत्नीवर आधी कुऱ्हाडीने घाव घातले; नंतर गळफास घेऊन स्वत:लाही संपविले!

By अनिल गवई | Updated: December 29, 2022 17:48 IST

पोलीस सुत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जामोद  तालुक्यातील माउली येथील बुधाजी भिकाजी वानखडे (६० ) या वृध्द इसमाने त्याच्या शोभाताई भिकाजी वानखडे (५५) पत्नीवर बुधवारी रात्री कुऱ्हाडीने सपासप वार केले. वृध्द महिला मृत्यू पावल्याची खात्री पटल्यानंतर स्वत:ही गळफास घेत, जीवनयात्रा संपविली.

जळगाव जामोद : खामगाव तालुक्यातील शिराळा येथील वृध्दाने पत्नीचा खून केल्याच्या घटनेची शाई वाळत नाही तोच, जळगाव जामोद तालुक्यातील एका वृध्दाने पत्नीवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. त्यानंतर गळफास घेऊन स्वत:लाही संपविल्याची खळबळजनक घटना माउली येथे गुरूवारी उघडकीस आली. बुधवारी उशीरा रात्री घडलेल्या या घटनेमुळे बुलडाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मुलाने सकाळी दरवाजा उघडल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.

पोलीस सुत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जामोद  तालुक्यातील माउली येथील बुधाजी भिकाजी वानखडे (६० ) या वृध्द इसमाने त्याच्या शोभाताई भिकाजी वानखडे (५५) पत्नीवर बुधवारी रात्री कुऱ्हाडीने सपासप वार केले. वृध्द महिला मृत्यू पावल्याची खात्री पटल्यानंतर स्वत:ही गळफास घेत, जीवनयात्रा संपविली. ही दुर्देवी घटना मुलाने दरवाजा उघडल्यानंतर गुरूवारी उघडकीस आली. मृतक वानखडे दाम्पत्याचा मुलगा सदानंद वानखडे याच्या तक्रारीवरून शोभाबाई वानखडे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी  बुधाजी भिकाजी वानखडे या वृध्दाविरोधात मृत्यूपश्चात भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. तर बुधाजी वानखडे यांच्या आत्महत्येप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस निरिक्षक सुनिल अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर भास्कर  करीत आहेत.

पत्नीची हत्याकरणारा वृध्द मनोरूग्ण- वृध्देने काठी फेकून मारल्याच्या संतापातून एका ७५ वर्षीय वृध्दाने काठीने ठेचून त्याच्या ७० वर्षीय पत्नीचा १६ डिसेंबर रोजी खून केला. त्यानंतर आता जळगाव जामोद तालुक्यातील एका मनोरूग्णाने चक्क कुऱ्हाडीने घाव घालून वृध्देचा खात्मा केला. त्यानंतर स्वत:ही गळफास घेतला. वृध्देची हत्या करणारा इसम हा मनोरूग्ण असल्याचे समोर येत आहे. वेडसरपणाच्या झटक्यातून वृध्दाने हा प्रकार केल्याचे पोलीस तक्रारीत नमूद केले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणाPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदार