शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यानं केली सेक्सची मागणी तर कर्मचाऱ्यानं मागितला किस; महावितरण कार्यालयातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 16:32 IST

पीडितेला तीन वेळा कामावरुन काढले व परत घेतले. ऑक्टोबर २०२१ मध्ये परत कामावरुन काढून टाकले. त्यानंतर पीडिता कधीच कार्यालयात गेली नाही.

जळगाव -  महावितरणच्या कार्यालयातील मानवसंसाधन विभागाच्या व्यवस्थापकाने त्यांच्याकडे कंत्राटी कर्मचारी म्हणून कामाला असलेल्या तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली तर लिपिकाने किस मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कार्यालयाच्या विशाखा समितीकडे तक्रार करुनही त्याची दखल न घेतल्याने पीडितेने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. त्यानुसार व्यवस्थापक उद्धव कडवे व निम्नश्रेणी लिपीक राजेंद्र अमोदकर या दोघांविरुध्द गुरुवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पीडितेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, २१ वर्षीय तरुणी ऑगस्ट २०१७ ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत महावितरणच्या मानव संसाधान विभागात बाह्यस्त्रोत कर्मचारी म्हणून कामाला होती. या विभागात व्यवस्थापक तथा विभाग प्रमुख म्हणून उद्धव कडवे हा आहे. टपालाच्या कामासंदर्भात सातत्याने त्याच्या दालनात जावे लागत होते. काम करत असताना कडवे याच्याकडून रात्री उशिरापर्यंत थांबविणे, शिपाई असताना पाणी आणायला लावणे असे कामे मुद्दाम सांगून रात्री उशीर झाला तर घरी सोडून देईल असे सांगत असतानाच कडवे याने शरीरसुखाची मागणी केली. त्यास नकार दिला असता तुला कामावरुन काढून टाकेल धमकी त्याने दिली. त्याची मागणी पूर्ण केली नाही म्हणून कडवे याने पीडितेला तीन वेळा कामावरुन काढले व परत घेतले. ऑक्टोबर २०२१ मध्ये परत कामावरुन काढून टाकले. त्यानंतर पीडिता कधीच कार्यालयात गेली नाही.

अपूर्ण कामाच्या नावाने पुन्हा बोलावले११ मे २०२२ रोजी निम्नश्रेणी लिपीक राजेंद्र आमोदकर याने पीडितेलाग फोन कर, असा मेसेज केला. त्यामुळे त्याला फोन केला असता तुझ्या कार्यकाळातील काही नोंदी बाकी आहेत. तुला कडवे साहेबांनी बोलावले आहे. असा निरोप आमोदकर याने दिला. त्यानुसार १२ मे रोजी दुपारी कार्यालयात गेल्यावर आमोदकर व कडवे यांना भेटून काय काम बाकी आहे अशी विचारणा केली. त्यावर नोंदीत काही क्रमांक रिक्त सोडले आहेत, ते पूर्ण करायचे आहे असे दोघांना सांगितले.अधिकारी म्हटला, मला माफ कर !कडवे याने पीडितेला दालनात बोलावले व टेक्नीकल साईडचे लोक माझ्याविरुध्द काही कटकारस्थान करीत आहेत, तू त्यांना सपोर्ट करते आहे असे मला समजले आहे, हे खरे आहे का? अशी विचारण केली. त्यावर मी काम सोडले आहे माझा आता कोणाशीच संबंध नाही असे पीडितेने सांगितले. त्यावर कडवे याने मागे जे झाले ते विसरुन जा, मला माफ कर. मी तुला कामावर परत घेतो असे सांगितले. त्यानंतर बाकी राहिलेल्या नोंदीचे काम पूर्ण कर व आमोदकर तुला घरी सोडून देईल असे सांगितले. काम पूर्ण झाल्यावर आमोदकर याने मी तुला घरी सोडतो असे सांगितले. त्यास नकार दिला असता आता तुझे काम झाले आहे, मला गिफ्ट दे असे म्हटला, त्यावर कसले गिफ्ट म्हणून विचारणा केल्यावर त्याने हातात हात घेतला आणि त्यानंतर किस मागितला. या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने वरिष्ठ तसेच कार्यालयातील विशाखा समितीकडे तक्रार केली, परंत, त्याची दखल घेण्यात आली नाही. म्हणून उशिराने पोलीस ठाणे गाठून तक्रारी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.