शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

४ मुलांच्या आईनं दोघांवर जीव लावला; लग्नाच्या १० दिवसापूर्वी एकाला संपवला, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 19:04 IST

बिटोलाची पती दिल्लीत दगड कापण्याचे काम करतो. अर्जुन त्याच्याकडे नोकरी करायचा. बिटोलाचे गावातील मुन्नासोबत संबंध होते. याचवेळी बिटोला अर्जुनच्याही प्रेमात पडली

बांदा - उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यात प्रेम प्रकरणात एका महिलेने कथित प्रियकरासोबत मिळून दुसऱ्या प्रियकराची कुऱ्हाडीनं हत्या केली आहे. वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. घटनास्थळी कुऱ्हाड आणि मृतकाचा मोबाईल सापडला आहे. या घटनेतील महिला ही ४ मुलांची आई असून तिला २ मुले आणि २ मुली आहेत. 

पोलिसांच्या माहितीनुसार, दुर्गापूर येथील अर्जुन उर्फ छोटे हा घरापासून १०० मीटर अंतरावरील एका गोठ्यात रविवारी झोपण्यासाठी गेला होता. सोमवारी सकाळी मोठा भाऊ जनावरांना चारा देण्यासाठी गोठ्यात पोहचला तेव्हा अर्जुन रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आले. त्याच्या गळ्यावर आणि शरीरावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले होते. स्थानिकांनी या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. 

मोठ्या भावाने सांगितले की, रात्री अर्जुनला फोन आला होता. गावातील बिटोला यादव आणि मुन्ना पांडे दरवाजा उघडण्यासाठी सांगत होते. मी दरवाजा उघडू नको असं सांगत त्यांना सकाळी भेटा असा निरोप द्यायला सांगितला. परंतु अर्जुननं ऐकलं नाही. तो घराबाहेर पडला. मुन्ना आणि बिटोला यांनी मिळून अर्जुनची हत्या केलीय असा आरोप करत भावाने मुन्ना पांडेय आणि बिटोला यादव यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला. 

बिटोलाची पती दिल्लीत दगड कापण्याचे काम करतो. अर्जुन त्याच्याकडे नोकरी करायचा. बिटोलाचे गावातील मुन्नासोबत संबंध होते. याचवेळी बिटोला अर्जुनच्याही प्रेमात पडली. तो कधीही गावात यायचा तेव्हा बिटोलाला भेटायला जायचा. मुन्नाला या दोघांच्या प्रेम प्रकरणाची माहिती पडली. तेव्हा त्याने बिटोलाला सोबत घेऊन अर्जुनचा काटा काढण्याचा ठरवले. त्या दोघांनी मिळून अर्जुनची हत्या केली. प्रथम दर्शनी हे हत्याचे प्रकरण वाटत असून पोलीस तपास करत आहेत अशी माहिती एएसपीने दिली. 

दिल्लीहून १५ दिवसांसाठी आला, २० तारखेला होतं लग्न अर्जुन दिल्लीला काम करायचा. १५ दिवसांपूर्वी तो दिल्लीहून आला होता. त्याचे २० फेब्रुवारीला लग्न होते. घरात लग्नाची तयारी सुरू होती. मात्र लग्नाच्या आधीच अर्जुनच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ज्या घरातून वरात निघणार होते तिथेच अर्जुनची अंत्ययात्रा काढण्याची वेळ आली. अर्जुन नेहमी लाला यादवकडून बिटोलासाठी पाठवलेले सामान दिल्लीहून घेऊन यायचा. त्यामुळे बिटोलासोबत अर्जुनची जवळीक वाढली. याचाच बदला घेण्यासाठी बिटोला प्रियकर मुन्ना पांडेयने महिलेसोबत मिळून अर्जुनची कुऱ्हाडीने हत्या केली.