शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

१३-१४ वर्षांच्या मुली ‘टार्गेट’, अर्ध्या रात्री मुलीचे तोंड दाबले...; एकाच दिवशी तीन तक्रारी

By प्रदीप भाकरे | Updated: February 24, 2024 13:51 IST

लैंगिक छळाचा प्रयत्न

अमरावती : अल्पवयीन मुलींच्या छेडखानीचे प्रकार अलीकडे अधिकच वाढले आहेत. गावातील टारगटांनी, सडकसख्याहरींनी अल्पवयीन मुलींना सॉफ्ट टार्गेट बनविल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे. २३ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी १३-१४ वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुलींची छेड काढण्यात आली. एकीला रात्रीच्या अंधारात नेत तिचा विनयभंग करण्यात आला. त्यातील दोन घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी, तर एक घटना धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले.अर्ध्या रात्री मुलीचे तोंड दाबले

तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात १३ वर्षीय मुलगी लघुशंकेसाठी घराबाहेर पडली असता, तिचे तोंड दाबण्यात आले. तिची छेड काढण्यात आली. २३ फेब्रुवारी रोजी पहाटे ही घटना घडली. याप्रकरणी सचिन दांडगे (२०, रा. बग्गी) व अजय स्वर्गे (२७, रा. जहागीरपूर) यांच्याविरुद्ध शुक्रवारी दुपारी विनयभंग व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी सचिन पीडिताला सोबत बाहेर घेऊन गेला, तर कोणी येते का हे पाहण्यासाठी अजय तेथे थांबल्याची तक्रार करण्यात आली आहे.

तू मला आवडतेस!

तू मला आवडते, आपले जमते काय, असे म्हणून एका १४ वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ च्या सुमारास लोणी पोलिसांच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली. आरोपी राहुल शिंदे (रा. काजना) हा तीन महिन्यांपासून तिचा लपून-छपून पाठलाग करून तिला इशारे करीत होता. दरम्यान, ती घरी एकटीच, भांडे घासत असताना आरोपीने तिची छेड काढली. याप्रकरणी लोणी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी राहुल शिंदेविरोधात विनयभंग व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल केला.तुझा धिंगाणा वाजवतो

तुझा धिंगाणा वाजवतो, अशी धमकी देत एका १४ वर्षीय मुलीची छेड काढण्यात आली. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एका गावात ती घटना घडली. फिर्यादी ही घरी एकटीच असताना आरोपी गजानन खंडारे (२७, रा. काजना) हा तिच्या घरातील अंगणात आला. तुला पाहतोच, तुझा धिंगाणा वाजवतो, असे म्हणून तिचा विनयभंग करण्यात आला. त्याने शिवीगाळ करून तिला धमकी दिली. तो एक वर्षांपासून तिची छेड काढत आहे. याप्रकरणी लोणी पोलिसांनी शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास गजानन खंडारेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळAmravatiअमरावतीPoliceपोलिस