शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

...म्हणून पत्नी आणि दोन चिमुकल्यांना विष देऊन व्यापाऱ्याने संपविले आयुष्य; शिवाजी नगर हत्या आत्महत्येचा उलगडा

By मनीषा म्हात्रे | Updated: October 3, 2022 19:48 IST

शिवाजी नगर हत्या आत्महत्येचा उलगडा

मुंबई : डोक्यावर दीड लाखाचे कर्ज. त्यात बहिणीच्या लग्नासाठी पैसे नसल्याच्या नैराश्यात पत्नी आणि दोन मुलांना विष देऊनशकील जलील खान (३४)  या व्यापाऱ्याने गळफास घेत आयुष्य संपविल्याचा धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. याप्रकरणी दोन महिन्याने शिवाजी नगर पोलिसांनी मृत खान विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.

शिवाजी नगरच्या रोड क्रमांक १४ येथील इंदिरानगर झोपडपट्टीत खान कुटुंबीय राहण्यास होते. शकील जलील खान (३४)  यांचा पान, सुपारी विक्रीचा व्यवसाय होता. पत्नी रजिया (२५), मुलगा सरफराज (७) आणि मुलगी अतिसा (३) असे त्यांचे हसते खेळते कुटुंब होते. २९ जुलै रोजी खान यांचा भाऊ रात्री जेवण उरकून घराबाहेर पडला. सकाळी घरी परतला तेव्हा, आतून काहीच प्रतिसाद येत नसल्याने त्यांना संशय आला.

जलील फोनही घेत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश करताच, जलील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. तर, रजिया यांच्या एका बाजूला सरफराज तर दुसऱ्या बाजूला कुशीत अतिसा बेशुद्धावस्थेत दिसून आली. घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी, तात्काळ सर्वाना जवळच्या सरकारी रग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले आले.

शिवाजी नगर पोलिसांनी केलेल्या तपासात खान याच्यावर दीड लाखाचे कर्ज होते. तसेच त्याला बहिणीच्या लग्नाचा खर्च स्वतः उचलायचा होता. मात्र त्यासाठीही पैसे उपलब्ध होत नसल्यामुळे तो नैराश्येत होता. याच तणावातून त्याने पत्नी आणि मुलांना शीतपेयातून विष देत स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, खान विरोधात रविवारी हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हत्येचा गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांनी दुजोरा दिला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस