शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ गायिकेच्या गळ्यातील मंगळसूत्र धूमस्टाईलने लांबविले, रहदारीच्या रस्त्यावर घडली घटना

By प्रशांत माने | Updated: February 27, 2023 16:52 IST

पुर्वेकडील टिळकरोड या रहदारीच्या रस्त्यावर हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

डोंबिवली : एकट्या दुकट्या महिला गाठून त्यांच्या गळ्यातील किमती ऐवज चोरट्यांकडून धुमस्टाईलने लांबविण्याचे प्रकार  सुरू असताना काल रात्री ९ च्या सुमारास येथील ज्येष्ठ शास्त्रीय गायिका, संगीत समीक्षक शुभदा श्रीकांत पावगी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अशाच प्रकारे लांबविल्याची घटना घडली आहे. पुर्वेकडील टिळकरोड या रहदारीच्या रस्त्यावर हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रविवारी फडके रोड, आप्पा दातार चौकातील श्री गणेश मंदिरात नाट्यसंगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम संपल्यावर शुभदा या आपल्या मुलासोबत टिळक रोडवरील आपल्या घरी परतत होत्या. त्यावेळी या रस्त्यावरील ब्राम्हण सभेजवळील मेरवान केक शॉपच्या समोरून जात असताना, समोरून एक लाल रंगाची दुचाकी आली आणि त्यावर बसलेल्या दोघांपैकी एकाने शुभदा यांच्या मानेवर जोराची थाप मारून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि मंगळसूत्र हिसकावून पलायन केले. त्यांच्या गळ्याला चोरट्यांनी ऐवज हिसकावताना फटका बसल्याने जखम झाली आहे. याप्रकरणी शुभदा यांच्या तक्रारीवरून दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

रामनगर हद्दीत चोरट्यांचा सुळसुळाट -रामनगर हद्दीत घडणारे गुन्हे स्थानिक पोलिसांकडून उघडकीस येत असलेतरी चोरीच्या गुन्ह्यांची मालिका सुरूच आहे. सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरी, सायकलचोरी आणि घरफोडीच्या घटना सातत्याने घडत आहेत. चोर आता रहदारीच्या रस्त्यावरही बिनदिककतपणे गुन्हे करू लागल्याने पोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिलाChain Snatchingसोनसाखळी चोरी