शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धारदार शस्त्राने मित्राची निर्घृण हत्या करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 14:14 IST

गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी आरोपीला बिहार राज्यात गावाला पळून जाण्याच्या तयारीत असताना पकडले आहे.

- मंगेश कराळे

नालासोपारा  : वाघराळपाडा येथे सोमवारी एकाची पोटावर धारदार चाकूने वार करत हत्या करून मृतदेह फेकून दिला होता. याप्रकरणी वालीव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. ही हत्या कोणी व का केली? याचा तपास करून गुन्ह्याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान वालीव पोलिसांसमोर उभे टाकले होते. 

गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी आरोपीला बिहार राज्यात गावाला पळून जाण्याच्या तयारीत असताना पकडले आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीताचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करण्यात आली. 

आरोपीचा शोध घेत असताना तंत्रिक विश्लेषन व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हयातील संशयित सुजित रामनारायण चौधरी (२६) याला राजीवली, वाघराळपाडा या परिसरातून ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कौशल्यपूर्ण चौकशी केली. 

आरोपीने कबुली दिली की, घटनास्थळावर दोघांमध्ये किरकोळ वादातुन व शिवीगाळीतुन आरोपीत याने कोंडीराम वाघमारे याचा खुन केल्याची कबुली दिली. आरोपी यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी