शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

१४ वर्षांपासून फरार असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2023 16:36 IST

१५ सप्टेंबर २०१० साली खैरपाडा येथील ताई पाटील चाळीत राहणाऱ्या पांधारी शामु राजभर (२५) याची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. 

- मंगेश कराळे

नालासोपारा : १४ वर्षापासून हत्या करून फरार असलेल्या मुख्य आरोपीला माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी मुंबईच्या अंधेरी येथून सोमवारी अटक केली आहे. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपास करत असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी मंगळवारी दिली आहे. १५ सप्टेंबर २०१० साली खैरपाडा येथील ताई पाटील चाळीत राहणाऱ्या पांधारी शामु राजभर (२५) याची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. 

आरोपीने त्याचे दोन्ही हात बांधुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत टाकुन दिले होते. त्यावेळी माणिकपूर पोलिसांनी हत्या, हत्येचा पुरावा नष्ट करणे या कलमानव्ये गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठांनी पोलीस ठाण्याला दाखल गुन्हयातील अभिलेखावरील पाहिजे व फरारी आरोपी यांची विशेष शोध मोहीम राबवुन त्यांच्या ठावठिकाणांबाबत माहिती घेवून त्यांना गुन्हयात अटक करण्याबाबत सुचना व मार्गदर्शन केले होते.

सदर सूचना व मार्गदर्शनांप्रमाणे माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तांञिक विश्लेषणाद्वारे व गुप्त बातमीदारांकडुन प्राप्त माहीतीचे आधारे फरार आरोपी नामे संजय गामा भारव्दाज (३९) याला अंधेरी येथुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता मयत इसमाने आरोपीस ५ हजार रुपये ऍडव्हान्स न दिल्याचा राग आल्याने आरोपीने त्याच्या साथीदारांसह त्याला कारमध्ये बसवुन रुमालाने त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर रुमालाने मयताचे हात पाठीमागे बांधुन त्यास मौजे ससुनवघर गावचे हद्दीत, मुंबई अहमदाबाद महामार्गावर मातीच्या ढिगा­ऱ्याजवळ फेकून दिले होते. तो मागील १४ वर्षापासुन बनारस, उत्तरप्रदेश व अंधेरी येथे आपले अस्तित्व लपवुन राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदरची कारवाई पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अभिजीत मडके, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार शैलेश पाटिल, धनंजय चौधरी, शामेश चंदनशिवे, अनिल चव्हाण व प्रविण कांदे यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी