शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तिघांनी वाट अडवली, तृतीयपंथीचे कपडे फाडले; अत्याचार केला अन्...; मुंबईतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 16:38 IST

मुंबईतील धक्कादायक घटना

मुंबई : मित्राला भेटायला गेलेल्या २६ वर्षीय तृतीयपंथीला तिघांनी मारहाण करत, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री शिवाजीनगर परिसरात घडली. मदतीला पुढे आलेल्या तृतीयपंथीवरही धारदार शस्त्राने हल्ला केला.

सदर प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी फैजान सिद्धिकी (२७) याला अटक केली आहे. गोवंडी परिसरात तक्रारदार तृतीयपंथी बुधवारी रात्री एकच्या सुमारास त्याच्या रफिकनगरमध्ये राहणाऱ्या मित्राला भेटण्यासाठी जात असताना, फैजानसह त्याच्या दोन साथीदारांनी त्यांची वाट अडविली, तसेच त्यांचे कपडे फाडून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. 

तृतीयपंथीने मदतीसाठी आरडाओरडा करताच, तेथील आणखी एक तृतीयपंथी पुढे आला. मात्र, आरोपींनी त्याच्याही डोक्यात हल्ला चढविला. यामध्ये दोघीही गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेची वर्दी लागताच, शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही तृतीयपंथींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर वरील घटनाक्रम समोर आला. या प्रकरणी पोलिसांकडून फैजानच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसMumbaiमुंबईTransgenderट्रान्सजेंडर