शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सासरच्या मंडळींनी छळ करत, लेकीचा केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 12:00 IST

तक्रारदार भारत जोशी (५०) हे मूळचे पालघरचे राहणारे असून त्यांची मुलगी सुस्मिता हिचे लग्न अंधेरीत राहणाऱ्या तरुणासोबत २७ डिसेंबर, २०२० रोजी झाले.

मुंबई : सासरच्या मंडळींनी लेकीचा छळ करून तिची हत्या केल्याचा आरोप वडिलांनी अंधेरी पोलिस ठाण्यात केला आहे. याप्रकरणी पतीसह त्याच्या कुटुंबीयांविरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.तक्रारदार भारत जोशी (५०) हे मूळचे पालघरचे राहणारे असून त्यांची मुलगी सुस्मिता हिचे लग्न अंधेरीत राहणाऱ्या तरुणासोबत २७ डिसेंबर, २०२० रोजी झाले. त्यापूर्वी साखरपुड्यात जोशी यांनी तिच्या पतीला रितीरिवाजाप्रमाणे सोन्याची अंगठी घातली व लग्नातही ऐपतीप्रमाणे दागदागिने दिले होते. तसेच लग्नाचा खर्चही वर-वधूने अर्धा अर्धा वाटून घेतला. अंधेरीच्या एका सोसायटीमध्ये मुलगी पतीसह राहत होती. मात्र, त्यानंतर तिचा छळ करण्यास कुटुंबीयांनी सुरुवात केली असा जोशी यांचा आरोप आहे. आठ दिवसांतच मुलीला माहेरपणासाठी आणल्यानंतर सासरची मंडळी नीट वागणूक देत नसल्याची तिने तक्रार पालकांकडे केली. तसेच, तुझ्या बापाने भीक मागून लग्न केले असेही टोमणे तिला ऐकवले जात असल्याचा आरोप आहे. 

तिला तिचा मोबाइल वापरायला देत नव्हते तसेच नवविवाहित पती-पत्नीला एकत्र झोपण्याचीही परवानगी नव्हती असेही जबाबात म्हटले आहे. रात्री बारा वाजता कपडे धुवायला सांगायचे, स्वयंपाक घरात झोपवायचे, मारहाण करायचे असे प्रकार सतत सुरू होते. अखेर २० जानेवारी रोजी सुस्मिताच्या सासऱ्यांनी फोन करून तुमची मुलगी मेली आहे असे जोशी यांना कळविले. त्यांनी तातडीने अंधेरीच्या क्रिटिकेअर रुग्णालयात धाव घेतली तेव्हा त्यांनी मृत मुलीला पाहिले. सासरच्या मंडळींनी छळ करून तिचा जीव घेतल्याचा आरोप जोशी यांनी केला आहे. आम्ही याप्रकरणी कोर्टाच्या निर्देशानुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी