शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सासरच्यांनी सुनेला गच्चीवरून फेकलं, वडिलांना बोलावून सांगितलं; लवकर या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 17:17 IST

Attempt to Murder : सध्या मुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

नवी दिल्ली :  राजधानीच्या मयूर विहारमध्ये सासरच्या लोकांनी सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या हेल्पलाइन 181 वर कॉल केल्यावर मुलीच्या भावाने सांगितले की, तिच्या 30 वर्षीय बहिणीला तिच्या सासरच्या लोकांनी पहाटे 3 वाजता टेरेसवरून खाली ढकलले. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या मुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.या प्रकरणाची दखल घेत दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली असून एफआयआर नोंदवण्यास सांगितले आहे. आयोगाला माहिती देताना मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांना मुलीच्या सासरकडून फोन आला आणि त्यांना सांगण्यात आले की, त्यांची मुलगी जिन्यांवरून पडली आहे आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेव्हा ते त्यांच्या मुलीच्या सासरच्या घरी पोहोचले तेव्हा शेजाऱ्यांनी सांगितले की, पहाटे 3 च्या सुमारास त्यांच्या सासरच्या लोकांनी त्यांच्या मुलीला गच्चीवरून फेकून दिले. मुलीच्या वडिलांनी आयोगाला सांगितले की, मुलीचे लग्न होऊन गेल्या तीन वर्षांपासून सासरचे लोक तिचा छळ करत होते.आयोगाकडून सांगण्यात आले की, मुलीच्या भावाने हॉस्पिटलमधून आयोगाला एक व्हिडिओही पाठवला आहे, ज्यामध्ये ती सांगत आहे की, तिला सासरच्या लोकांनी गच्चीवरून खाली फेकले आहे. सध्या त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. त्याचबरोबर आयोगाने पोलिसांना एफआयआर नोंदवण्यासोबतच दंडाधिकाऱ्यांसमोर मुलीचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. यासोबतच या प्रकरणातील आरोपींच्या अटकेचीही मागणी करण्यात आली आहे. आरोपींना अटक झाली नाही, त्याचे कारणही विचारण्यात आले आहे. सोबतच या संपूर्ण प्रकरणाचा कार्यवाही अहवाल २० जूनपर्यंत मागविण्यात आला आहे.

यासंदर्भात आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याची गंभीर तक्रार प्राप्त झाली आहे. एक 30 वर्षीय तरुणी रुग्णालयात जीवन-मरणाची झुंज देत आहे. पोलिसांना नोटीस पाठवली आहे. मुलीचा जबाब तातडीने नोंदवून याप्रकरणी कठोर पावले उचलावीत.

 

 

टॅग्स :Domestic Violenceघरगुती हिंसाPoliceपोलिसArrestअटकMadhya Pradeshमध्य प्रदेश