शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

घर बंद करून गेले परगावी, इकडे चोरट्यांनी घर फोडले; कुंभारीत साडेतीन लाखांची चोरी

By appasaheb.patil | Updated: January 29, 2023 15:32 IST

ही घटना क्रिस्टल सोसायटी नंबर २, कुंभारी (ता. द. सोलापूर) येथे घडली. याबाबतची माहिती रविवारी सकाळी पोलिसांनी माध्यमांना दिली. 

सोलापूर : घर बंद करून गावी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कडीकोंयडा तोडून घरातील साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. यात रोख रक्कम व सोन्यांच्या दागिन्याचा समावेश आहे. ही घटना क्रिस्टल सोसायटी नंबर २, कुंभारी (ता. द. सोलापूर) येथे घडली. याबाबतची माहिती रविवारी सकाळी पोलिसांनी माध्यमांना दिली. 

याबाबत रविकिरण मल्लिकार्जुन कोप्पल (वय ३२, रा. कुंभारी, ता. द. सोलापूर) यांनी वळसंग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार कोप्पल परिवार हे घर बंद करून गावी गेले होते. या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

घरातील कपाटात ठेवलेले रोख रक्कम २ लाख रुपये, १ लाख २० हजारांचे सोन्याचे गंठण व १२ हजाराचे चार ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे कर्णफुले असा एकूण ३ लाख ३२ हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. या घटनेची नोंद वळसंग पोलिस ठाण्यात झाली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शेख हे करीत आहेत.

क्रिस्टल सोसायटी चोरी प्रकरणात वळसंग पोलिस कसून तपास करण्यास सुरुवात केली आहे. रविवारी पोलिस उपनिरीक्षक शेख यांनी पंचनामा करून तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. चोरट्यांच्या शोधासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज व परिसरातील लोकांची मदत घेण्यात येणार असल्याचे शेख यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी