माणसाच्या विकृतीला कोणती सीमा असते? या प्रश्नाचे उत्तर चामराजनगरमधील एका घटनेने दिले आहे. चामराजनगर येथील एका हाऊसिंग बोर्ड कॉलनीमध्ये एका अज्ञात मनोरोगी व्यक्तीच्या घृणास्पद कृत्यामुळे महिलांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा विकृत इसम केवळ महिलांचे अंतर्वस्त्र चोरत नाही, तर ते परिधान करून सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळेही करतो. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
गेल्या काही दिवसांपासून या कॉलनीतील घराबाहेर वाळत घातलेले महिलांचे कपडे गूढरित्या गायब होत होते. सुरुवातीला रहिवाशांना वाटले की ही किरकोळ चोरी असावी. मात्र, हा प्रकार वारंवार घडू लागल्याने नागरिकांचा संशय बळावला. अखेर सत्य शोधण्यासाठी काही रहिवाशांनी आपल्या घराबाहेर लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. जे समोर आले ते पाहून सर्वांचीच पाचावर धारण बसली.
मध्यरात्री स्त्री वेषात वावर
सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले की, हा आरोपी मध्यरात्रीच्या सुमारास स्त्री वेषात कॉलनीमध्ये शिरतो. अत्यंत चलाखीने तो घराबाहेर वाळत घातलेले महिलांचे अंतर्वस्त्र चोरतो. धक्कादायक बाब म्हणजे, ते चोरलेले कपडे तो तिथेच परिधान करतो आणि कॅमेऱ्यासमोरच अत्यंत अश्लील आणि घृणास्पद चाळे करू लागतो. त्याची वागणूक आणि मानसिक स्थिती पाहता तो एखादा मनोरोगी असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
महिलांमध्ये दहशतीचे सावट, पोलिसांकडून शोध सुरू
या घटनेमुळे हाऊसिंग बोर्ड कॉलनीतील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. "ही केवळ कपड्यांची चोरी नसून महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न आहे. अशा मानसिकतेची व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकते," अशी भीती स्थानिक महिलांनी व्यक्त केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच चामराजनगर टाउन पोलिसांनी तातडीने तपास चक्राला गती दिली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. लवकरात लवकर या विकृत व्यक्तीला जेरबंद करून कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
Web Summary : A man in Chamarajanagar is terrorizing women by stealing their lingerie and performing obscene acts in public. CCTV footage captured the disturbing behavior, revealing the man dressing in women's clothing and engaging in lewd acts. Police are investigating and searching for the suspect.
Web Summary : चामराजनगर में एक आदमी महिलाओं के अंतर्वस्त्र चुराकर और सार्वजनिक रूप से अश्लील हरकतें करके आतंक मचा रहा है। सीसीटीवी फुटेज में परेशान करने वाला व्यवहार कैद हुआ, जिसमें आदमी महिलाओं के कपड़े पहनकर अश्लील हरकतें कर रहा है। पुलिस जांच कर रही है और संदिग्ध की तलाश कर रही है।