शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 09:59 IST

पोलिसांनी वेळ न दवडता अवघ्या १२ मिनिटांमध्ये सांताक्रुझ येथील घटनास्थळ गाठत त्या व्यक्तीला गळफास घेऊन आत्महत्या करण्यापासून वाचवले

पणजी - जुने गोवे पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे अवघ्या १२ मिनिटांमध्ये आपले आयुष्य संपविण्याच्या तयारीत असलेल्या एका व्यक्तीचा जीव वाचला. ही घटना रविवारी, दि. २७ रोजी सांताक्रुझ भागात घडली.

या व्यक्तीला पणजी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मानसिक आजार कायद्याअंतर्गत दिलेल्या निर्देशांनुसार, पुढील मानसिक उपचारांसाठी पोलिसांनी बांबोळी येथील मनोरुग्ण इस्पितळात पाठविले आहे. पोलिसांनी वेळेत हालचाल करून आत्महत्या करून आपले जीवन संपविण्याची तयारी करणाऱ्या या व्यक्तीला वाचविल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, रविवारी रात्री १०:२४ वाजता सांताक्रुझ येथील एक व्यक्ती त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याचा फोन कॉल जुने गोवे पोलिसांना पणजी नियंत्रण कक्षातून आला. फोन कॉल येताच जुने गोवे पोलिसांनी वेळ न दवडता अवघ्या १२ मिनिटांमध्ये सांताक्रुझ येथील घटनास्थळ गाठत त्या व्यक्तीला गळफास घेऊन आत्महत्या करण्यापासून वाचवले. संबंधित व्यक्ती घरात एकटाच राहात होता. त्यामुळे नैराश्यात गेला होता.

नैराश्य आल्याने घेतला होता निर्णयही व्यक्ती घरात एकटीच राहात होती. पत्नी व मुलीपासून वेगळा राहात असल्याने तो नैराश्यात गेला होता. त्यातूनच त्याने आपले आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतल्याचे चौकशीत समोर आले. पोलिस वेळेत पोहोचले नसते तर कदाचित त्याने त्याचे जीवन संपवले असते. जुने गोवे पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचल्याने लोकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. दरम्यान, या व्यक्तीला नैराश्यातून बाहेर काढण्याच्या दृष्टीने मनोरुग्ण इस्पितळात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस