शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पळून जाऊन लग्न करण्यास प्रेयसीचा नकार; संतप्त प्रियकरानं कुऱ्हाडीनं शिर धडापासून वेगळं केलं, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 09:19 IST

प्रियकर विष्णू आणि प्रेयसीची भेट झाली. तेव्हा त्याने प्रेयसीवर पळून जाऊन लग्न करण्यास दबाव टाकला.

चित्रकूट – उत्तर प्रदेशच्या चित्रकूट जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. याठिकाणी प्रियकरानं प्रेयसीची निर्दयी हत्या केल्याचं समोर आलं आहे. मऊ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हटवा गावात एका मुलीचा विना धड मृतदेह आढळला. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. त्यात या प्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी या हत्येचा खुलासा केला आहे.

पोलीस अधीक्षक धवल जयस्वाल म्हणाले की, हटवा गावातील एका तरूणीचं गावातच राहणाऱ्या विष्णू नावाच्या व्यक्तीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. मागील १ वर्षापासून दोघंही रिलेशनशीपमध्ये होते. ज्याची भनक नातेवाईकांना लागली. त्यामुळे प्रियकर विष्णूच्या घरच्यांनी त्याला बांदा जिल्ह्यातील नातेवाईकांकडे राहण्यास पाठवले. तर प्रेयसीच्या घरच्यांनी तिचं लग्न मध्य प्रदेशातील टीकमगड येथे १६ फेब्रुवारीला लग्न निश्चित केले होते. प्रेयसीचं लग्न ठरल्याचं प्रियकराला कळालं. त्यानंतर ७ फेब्रुवारीला तो गावी परतला आणि प्रेयसीला गिफ्ट देण्याच्या बहाण्यानं एका निर्माणधीन इमारतीत भेटायला बोलावलं.

प्रियकर विष्णू आणि प्रेयसीची भेट झाली. तेव्हा त्याने प्रेयसीवर पळून जाऊन लग्न करण्यास दबाव टाकला. ज्यावर प्रेयसीनं पळून जात लग्न करण्यास नकार दिला. तेव्हा प्रियकराला राग अनावर झाला त्याने दोन जणांसोबत मिळून प्रेयसीची हत्या केली. त्यानंतर मृतदेह लपवून ठेवला. आरोपीनं पहिल्यांचा मुलीचा गळा आवळला त्यानंतर कुऱ्हाडीनं तिचं शिर शरीरापासून वेगळं केले. त्यानंतर आरोपी प्रियकरानं स्वत:चा आणि तिचा फोन शेतात लपवला. त्यानंतर पुन्हा नातेवाईकांकडे निघून गेला. मृत मुलीच्या घरच्यांनी प्रियकरावर अपहरणाचा आरोप लावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर कसून चौकशी सुरू केली. १ मार्चला मुलीचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर आरोपी प्रियकराला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी प्रियकराच्या सांगण्यावरून पोलिसांनी शेतातून दोघांचे मोबाईल जप्त केले आणि गुन्ह्यात साथ देणाऱ्या इतर आरोपींनाही जेरबंद केले. मात्र या घटनेने गावात सगळेच हैराण झाले आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश