शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

तरूणीने लिंकवर फॉर्म भरला अन् १ लाख २४ हजार ठगाच्या खात्यात...

By सागर दुबे | Updated: April 20, 2023 15:28 IST

शहरातील जुन्या एमआयडीसीतील स्वाती विठ्ठल तायडे या तरुणीला तब्बल १ लाख २४ हजारांना गंडा घातला आहे.

जळगाव : जळगावात सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच आहे. यामध्ये सर्वाधिक गुन्हे हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. फसवणुकीचे नवनवीन फंडे हे सायबर गुन्हेगार शोधत असतात. असाच एका नव्या पद्धतीने शहरातील जुन्या एमआयडीसीतील स्वाती विठ्ठल तायडे या तरुणीला तब्बल १ लाख २४ हजारांना गंडा घातला आहे. बी टू सी स्मार्ट एक्सप्रेस कुरिअर सर्व्हीस कंपनीच्या लिंकवर फॉर्म भरायला सांगून सायबर ठगाने तरूणीची फसवणूक केली आहे.

स्वाती तायडे ही तरूणी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. १ एप्रिल रोजी तिने ऑनलाइन साडी बुक केली होती. ही साडी ३ एप्रिल रोजी बी टू सी स्मार्ट एक्सप्रेस कुरिअर सर्व्हीस कंपनीद्वारे मिळणार होती. पण, ७ एप्रिल तारीख येऊनही साडी मिळाली नाही. त्यामुळे तरूणीने कुरिअर कंपनीच्या संकेतस्थळावर साडीच्या डिलिव्हरी स्टेटस् चेक केले. त्यावेळी तिला डिलेव्हरी पेडींग दिसून आली म्हणून कुरिअर कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी त्या व्यक्तीने तरूणीला तुमचा पत्ता सापडत नसल्यामुळे पार्सल पेडींग दिसत असल्याचे सांगून कंपनीच्या लिंकवर जाऊन एक फॉर्म भरण्यास सांगितला. त्यानुसार तरूणीने संपूर्ण फॉर्म भरला.

बॅलेन्स तपासले, धक्काच बसला...दरम्यान, फॉर्म भरल्यानंतर काही मिनिटानंतर तरूणीला तिच्या खात्यातून पैसे कपातीचे मेसेज प्राप्त झाले. क्रेडीट कार्ड आणि बँक खात्यातून पैसे कपातीचा मेसेज आल्यानंतर तरूणीला शंका निर्माण झाली. तरूणीने ऑनलाइन खात्यातील रक्कम तपासल्यानंतर त्यातील रक्कम कमी झालेली दिसून आली. काही वेळानंतर पुन्हा तिने ऑनलाइन बॅलेन्स तपासल्यानंतर तब्बल १ लाख २४ हजार रूपये खात्यातून गायब झालेली दिसून आली. अखेर बुधवारी तिने एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार सायबर ठगाविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी