शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
4
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
5
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
6
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
7
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
8
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
9
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
10
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
11
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
12
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
13
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
14
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
15
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
16
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
17
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
18
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
19
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
20
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

थरारक! सासूसह ७ वर्षीय मुलावर बापानं केले वार, त्यानंतर स्वत:लाच जाळून घेतलं

By राजकुमार जोंधळे | Updated: August 24, 2022 00:11 IST

मुलगा, सासूवर कत्तीने सपासप वार करुन जावयाची लातुरात आत्महत्या

राजकुमार जोंधळे 

लातूर - बायको नांदायला येत नाही या कारणावरुन उदगीर येथील एका जावयाने कत्तीने निर्दयीपणे आपल्या पोटच्या सात वर्षीय मुलावर आणि ५० वर्षीय सासूवर सपासप वार करून हत्या करण्याचा खळबळजनक प्रयत्न मंगळवारी रात्री केला. या हल्ल्यात सासूचा जागीच मृत्यू झाला, मुलगा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, जावयाने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली आहे. ही घटना लातुरातील वीर हणमंतवाडी परिसरात घडली. या घटनेने लातुरात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी सांगितले, उदगीर येथील रजनीकांत वेदपाठक (वय ३५ रा. उदगीर) याच्यासोबत लातुरातील वीर हणमंतवाडी येथील चंद्रसेना संजयकुमार वेदपाठक (वय ५०) यांच्या मुलीसोबत आठ वर्षापूर्वी रितिरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते.  लग्नानंतर कांही दिवस त्यांचा संसार सुखाने सुरु होता. दरम्यान, त्यांना कार्तिक हा मुलगा झाला. त्यानंतर त्यांच्यात बेबनाव निर्माण झाला. यातूनच त्यांच्यामध्ये सतत काहीना काही कारणावरुन भांडण, तंटा होत असे. या वादावादीला कंटाळलेली रजनीकांतची पत्नी लातुरातील वीर हणमंतवाडी येथील आपल्या आईच्या घरी गेल्या काही वर्षपासून राहत होती. अधूनमधून जावई हा बायकोला नांदायला पाठवा, असे म्हणून सासू आणि पत्नीसोबत वाद घालत होता. अखेर आज काटाच काढायचा, असे ठरवून सासरवाडीत मंगळवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास आला. काही समजायच्या आतच मुलगा कार्तिक याच्या मानेवर त्याने कत्तीने वार केले. सासू मुलाला वाचविण्यासाठी पुढे आली असता तिच्यावरही सपासप वार केले. सासू जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तिचा जागेवरच मृत्यू झाला. तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीशैल्य कोल्हे करत आहेत. 

कार्तिकला खाजगी रुग्णालयात दाखल...

जखमी कार्तिकला शेजारच्या मावस सासूने तातडीने उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची प्रकृर्ती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

सासरवाडीतच स्वतःला जाळून घेतले...

घटनेनंतर जावयाने स्वतःला पेटवून घेत जाळून घेतले असून, त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्यास शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. 

पोलीस अधीक्षकाची घटनास्थळी भेट...

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांनी भेट देवून पाहणी केली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.